टेंभुर्णी येथे वीज मंडळाच्या विरोधात विविध पक्षीय रस्ता रोको आंदोलनाला यश
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त) :- थकीत वीजबिल भरण्यास दोन दिवसाची वाढीव मुदत देऊन आजच वीज सुरू करण्याचे आश्वासन दिल्याने शिवसेनेचे नेते संजय कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली होणारे रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले.
टेंभुर्णीतील पुणे - सोलापूर रोडवर संभाजी चौक येथे वीज वितरण कंपनीच्या जाचक अटीच्या विरोधात संजय कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.मात्र सोमवारी सकाळी ११ वा.सर्वपक्षीय कार्यकर्ते आंदोलन करण्यासाठी एकवटले असता वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता यु.जे.जाधव, पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे या अधिकाऱ्यांनी तेथे येऊन यशस्वी मध्यस्थी केली. यामुळे नियोजित आंदोलन स्थगित करण्यात आले.
यावेळी बोलताना संजय कोकटे म्हणाले की, पैसे भरूनही वीज सुरू होत नाही. यामुळे संपूर्ण वीज बंद करून वीजबिल वसुली करण्यास शेतकऱ्यांचा विरोध आहे. आपल्या वीजबिल वसुली मोहिमेचा त्रास अशा नियमित बिल भरणाऱ्या शेतकऱ्याना होतो.जे शेतकरी मुद्दामहून पैसे भरत नाहीत त्यांच्यावर वीज बंद करून कारवाई केली तरी आम्ही त्यांना पाठीशी घालणार नाही असे सांगून कोकाटे यांनी या चुकीच्या वीजबिल वसुली मोहिमेचा मोजक्या शब्दात समाचार घेतला.
यावेळी माजी जि प सदस्य शिवाजी कांबळे, शिवसेना तालुकाप्रमुख मधुकर देशमुख , भाजपचे माढा तालुकाध्यक्ष योगेश बोबडे, चेअरमन राम टकले यांनीही जोरदार फटकेबाजी करीत वीजबिल वसुली मोहिमेवर टीका केली.एवढ्या दिवसात वीजबिल का दिले नाही असा सवाल उपस्थित केला.तर काहीजणांनी पाच एच.पी.विद्युत पंपास दहा एच.पी.चे बिल कसे काय येत आहे असा प्रश्न उपस्थित करून हे दुरुस्त झाले नाहीतर वीजबिल वसूल करण्याचा वीज वितरण कंपनीस नैतिक अधिकार आहे का? असा प्रश्न विचारला आहे.
यावेळी शिवसेनेचे संजय कोकाटे, माझी जि प सदस्य शिवाजी कांबळे,रयत क्रांती संघटनेचे प्रा.सुहास पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख मधुकर देशमुख, भाजपचे तालुकाध्यक्ष योगेश बोबडे, आर पी आयचे जयवंत पोळ ,योगेश पाटील, बेंबळे चे नेते पोपट अनपट, राजेंद्र चवरे, महाडिक, कोंढार बागाचे नेते बबनराव केचे, चेअरमन राम टकले, अकोले चे गटनेते सतीस सुर्वे, जाणताराजा मित्र मंडळाचे संस्थापक सुधीर महाडिक,नागनाथ वाघे, भाजपचे बाळासाहेब ढगे, मगन महाडिक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी पोनि राजकुमार केंद्रे, सपोनि अमित शितोळे, सपोनि सुशील भोसले व त्यांच्या सर्व सहकारी पोलीस कर्मचारी यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
0 Comments