मुरघास निर्मितीच्या सायलेज बेलर मशिन युनिट स्थापन्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- राष्ट्रीय पशुधन अभियान (NLM) (अनुसुचित जाती उपयोजना) योजनेअंतर्गत मुरघास निर्मितीच्या सायलेज बेलर मशिन युनिट स्थापन्यासाठी जिल्ह्यातील संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. 25 मार्च 2021 पर्यंत पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागात प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एन.ए. सोनवणे यांनी केले आहे.
प्रति मुरघास निर्मिती युनिटसाठी 10 लाख रूपये (50 टक्के केंद्र हिस्सा) निधी असून उर्वरित 50 टक्के 10 लाख रूपये संस्थेने स्वत: खर्च करावयाचे आहेत. जिल्ह्यातील एकाच संस्थेला योजनेचा लाभ द्यावयाचा आहे. जिल्ह्यातील सहकारी दूध उत्पादक संघ/संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, स्वयंसहाय्यता बचत गट व गोशाळा/पांजरापोळ संस्था हे प्रस्ताव सादर करु शकतील. ही योजना अनुसूचित जाती उपयोजना योजनेतील असल्याने अनुसूचित जाती उपयोजना प्रवर्गातील संस्थांनाच लाभ देय आहे. अनुसूचित जाती प्रवर्गात दूध संस्था, गोशाळांची नोंदणी नसल्यास या प्रवर्गातील शेतकरी उत्पादक कंपनी स्वयंसहाय्यता बचत गट प्रस्ताव सादर करु शकतील.
0 Comments