Hot Posts

6/recent/ticker-posts

टेंभुर्णी सार्वजनिक सभागृह प्रकरणी तत्कालीन सी ई ओ अरुण डोंगरे सहित माजी सरपंच,उपसरपंच यांचेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

 टेंभुर्णी सार्वजनिक सभागृह प्रकरणी तत्कालीन सी ई ओ अरुण डोंगरे सहित माजी सरपंच,उपसरपंच यांचेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

बशीर जहागीरदार यांनी केली होती तक्रार

टेंभुर्णी (कटुसत्य वृत्त ) :-  टेंभुर्णी येथील वादग्रस्त सार्वजनिक सभागृहाची जागा २००२ साली बेकायदेशीररित्या विठ्ठल बाजारासाठी देण्यात आली होती त्या बाबत त्या जागेची तक्रार २०१७ साली बशीर जहागीरदार यांनी केल्याने ती जागा बळकवण्यासाठी त्या जागेची बेकायदेशीरपणे विल्हेवाट लावण्यासाठी तत्कालीन सीईओ  अरुण डोंगरे,माजी सरपंच,माजी उपसरपंच यांनी संगनमताने खोटे ठराव,खोटे कागदपत्र व खोटे रजिस्टर करार केले होते. त्याविषयी टेंभुर्णीचे सामाजिक कार्येकर्ते बशीर जहागीरदार यांनी माढा कोर्टात पुरावेसहित फौजदारी तक्रार दाखल केली होती.त्याची दखल घेत २ मार्च २०२१ रोजी माढा कोर्टाने तत्कालीन सी.ई.ओ तसेच नांदेडचे जिल्हाधिकारी १)अरुण डोंगरे रा.नांदेड ,  २)सुलन रावसाहेब देशमुख. माजी सरपंच (वय. ५७)रा. टेंभुर्णी ,३) प्रमोद कुटे. माजी उपसरपंच. (वय.३७)रा. टेंभुर्णी , ४)जयंत खंडागळे. तत्कालीन ग्रामसेवक(वय.३७)रा. टेंभुर्णी , ५) संतोष वरपे (वय.४७) रा.निमगांव (टें), विठ्ठल मध्यवर्ती सह. ग्राहक भांडार, मर्या. टेंभुर्णी (विठ्ठल बजार) सचिव  रा.निमगांव (टें),  ६)गजानन तोडकर (वय.४७)रा. अकोले (खुर्द), ७)संतोष बनकर (वय.३३)रा. टेंभुर्णी या ७ जणांवर्ती माढा  कोर्टाने १६६अ, १६७,४२०,४०६,४०८,५११rw,व ३४ कलमान्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
         अधिक माहिती अशी की २००२ साली टेंभुर्णी ग्रामपंचायतीसाठी नव्याने बांधलेले ग्रामसचिवलयाचे इमारतीतील तळमजल्यावर ग्रामस्थांसाठी असलेले सार्वजनिक सभागृहाची २५०० चौ फुट जागा २००२ सालचे सरपंच,उपसरपंच व ग्रामसेवक यांनी बेकायदेशीररित्या २९ वर्षाचे कराराने  विठ्ठल बाजारासाठी दिली होती.परंतू सार्वजनिक सभागृहाची जागा बेकायदेशीररित्या विठ्ठल बाजाराला दिल्याची तक्रार बशीर जहागीरदार यांनी २०१६ साली केली होती.तक्राराची दखल घेत तत्कालीन सीईओ अरुण डोंगरे यांनी एका  महिन्यात सदरचे विठ्ठल बाजार खाली करण्याची नोटीस बजावली होती व २९ वर्षांचा ग्रामपंचायत यांनी केलेला २००२ सालचा बेकायदेशीर करार रद्द करण्याचे आदेश देखील टेंभुर्णी ग्रामपंचायतीला दिले होते.त्या अनुषंघाने टेंभुर्णी ग्रामपंचायतीने  विठ्ठल बाजारचा २००२ सालचा २९ वर्षांचा करार मासिक सभेत रद्द  केला,परंतू लगेच त्याच मासिक सभेत विठ्ठल बाजारचा दुसरा ठराव ११ महिन्यांचा केला,तो करार कमी कालावधीचा असल्याने पुढील मासिक सभेत ग्रामपंचायतीने पुन्हा ९९ वर्षांचा विठ्ठल बाजारचा ठराव केला परंतू तो ठराव देखील बेकायदेशीर असल्याने पुन्हा पुढील मासिक सभेत ५ वर्षांचा करार करुन जिल्हा परिषद सोलापुर यांच्याकडे मंजूरीसाठी  पाठवले होते.पहिला करार रद्द करणारे सीईओ अरुण डोंगरे यांनी टेंभुर्णी ग्रामपंचायतीचा ५ वर्षांचे विठ्ठल बाजारचे कराराला मान्यता दिली व माढा दुय्यम निबंधक कार्यलयात रजिस्टर करार करण्याचे बेकायदेशीर आदेश दिले होते व त्या प्रमाणे ग्रामपंचायत टेंभुर्णी यांनी तो रजिस्टर करार  देखील   केला  होता.
       तत्कालीन सीईओ अरुण डोंगरे यांनी २० सप्टेंबर २०१६ रोजी रजिस्टर करार करण्याचे पत्र ग्रामपंचायत टेंभुर्णीचे सरपंच,ग्रामसेवक व  विठ्ठल बाजारचे सचिव संतोष वरपे यांना दिले होते ते पत्र संबंधीतांना २१  सप्टेंबर २०१६ रोजी मिळाला परंतू बशीर जहागीरदार हे वरिष्ट अधिकारी यांचेकडे तक्रार दाखल करतील या एकमेव  उद्देशाने  घाई गडबड करुन तत्कालीन सरपंच,उपसरपंच,ग्रामसेवक,संतोष वरपे व सीईओ  अरुण डोंगरे यांनी संगनमताने १७ सप्टेंबर रोजी रजिस्टर करार केला व कराराचे आदेश होते २० सप्टेंबरचे कराराचे आदेशाच्या तारखेच्या ३ दिवस अगोदर  अरुण डोंगरे यांनी २० तारखचे आदेश  विठ्ठल बाजारचा करार करण्यासाठी १७ तारखेला दिले व त्या प्रमाणे तो करार करण्यात आला,परंतू १७ तारखेचे करारात २० तारखेचे आदेश जोडण्यात आल्याने हा सर्व फसवणुकीचा प्रकार कागदोपत्री उघड झाले होते.या विषयी अनेक तक्रारी वरिष्ट अधिकारी यांचेकडे जहागीरदार यांनी केली होती त्याचा पाठपुरावा देखील केला होता परंतू न्याय मिळत नसल्याने त्यांनी माढा कोर्टात  ५९०/२०१७ अन्वये फौजदारी तक्रार दाखल केली होती,त्या प्रमाणे तत्कालीन सीईओ अरुण डोंगरे सहित इतर ६ जणांवर्ती  १६६अ, १६७,४२०,४०६,४०८,५११rw,    34 कलमांवये गुन्हा दाखल करण्याचे प्रोसेस माढा कोर्टाने इश्यु केले आहे सदर प्रकरणाची फिर्यादीची बाजू बार्शीचे वकील नितीन गजेंद्र शिंदे यांनी पहिली.

Reactions

Post a Comment

0 Comments