Hot Posts

6/recent/ticker-posts

वंचित बहुजन आघाडी च्या वतीने माढा तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन

 वंचित बहुजन आघाडी च्या वतीने माढा तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन

टेंभुर्णी  (कटुसत्य वृत्त )  :-  वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने आज दिनांक 5 मार्च 2021 शुक्रवारी सकाळी माढा तहसील समोर  शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी व केंद्र सरकारने केलेल्या 3 जुलमी व शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याच्या प्रमुख मागणीसाठी आद. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशाने वंचित बहुजन आघाडी (माढा लोकसभा) विभाग, जिल्हा सोलापूर तसेच माढा तालुक्याच्या वतीने माढा तहसील कार्यालयासमोर या एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले हे आंदोलन जिल्हा अध्यक्ष राहुल गौतम चव्हाण,  जिल्हा महासचिव विशाल नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सर्व आजी माझी पदाधिकारी , कार्यकर्ते व शेतकरी बांधव यांच्या उपस्थितीत करण्यात आले...
 यावेळी  वंचित बहुजन आघाडी जिल्हा अध्यक्ष राहुल  चव्हाण ( जिल्हा महासचिव विशाल नवगिरे, जिल्हा उपाध्यक्ष सत्यवान हांडे, जिल्हा संघटक शरीफ काझी, एम. बी. कांबळे, राजेंद्र साळवे यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्याच बरोबर विशाल मिसाळ, सुदर्शन बेडेकर, औदुंबर लेंगरे, विजय डोळसे, सोनबा माने, सचिन शेंडगे, अजिंक्य लांडगे, अविनाश लोंढे, गणेश खरात, सागर सरोदे, तात्यासाहेब सरवदे, राजू वाघमारे, किरण कांबळे, प्रमोद वजाळे, सचिन झेंडे, राम नवगिरे, प्रवीण वाघमारे, नितीन कांबळे, योगेश वाघमारे, जुगल खरात, सुमित लक्ष्मण खरात, शुभम शिरसाट, सर्जेराव लोंढे, ओंकार वाघमारे, ललित रिकिबे, भीमराव तरंगे, राजकुमार सरवदे, अजय भोसले, प्रेम रीकिबे, रंजीत गायकवाड आदी उपस्थित होते...


Reactions

Post a Comment

0 Comments