Hot Posts

6/recent/ticker-posts

मनसेचा रास्तारोको, आ. बबन यांच्या सुचनेने अखेर खंडित वीजपुरवठा होणार सुरळीत

 मनसेचा रास्तारोको, आ. बबन यांच्या सुचनेने अखेर खंडित वीजपुरवठा होणार सुरळीत

 मनसेचे रास्तारोको आंदोलन मागे


लऊळ  ( कटुसत्य वृत्त ) :-  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अंबाड,शिराळ , लऊळ या माढा तालुक्यातील गावातील सतत होणारा अनियमित वीजपुरवठा सुरळीत चालू करावा यासाठी कुर्डुवाडी राज्य महावितरण येथे  दिनांक १६ मार्च रोजी निवेदन देत रास्तारोकोचा इशारा देण्यात आला होता.सदर निवेदनाची वीज महामंडळाने कोणतीही दखल घेतली नसल्याने गुरुवार १८मार्च रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अंबाड ता.माढा येथे रस्ता रोको करण्यात आला.यावेळेस मोठ्या प्रमाणात शेतकरी रस्त्यावरती उतरले होते. वाहनांच्या एक किलोमीटर लांब रांगा लागल्या होत्या. 


               शेतकऱ्यांचा वाढती नाराजी लक्षात घेऊन वीज मंडळाचे  अधिकारी त्याठिकाणी आले. अधिकाऱ्यांसमोर शेतकरी आपले गाऱ्हाणे मांडत असतानाच माढा तालुक्याचे विद्यमान आ. बबन शिंदे कामानिमित्त कुर्डुवाडी याठिकाणी जात असताना सदर प्रकार पाहण्यासाठी त्याठिकाणी आले व शेतकऱ्यांचे मत जाणून घेऊन आ. शिंदे यांनी त्याच ठिकाणी वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांना अंबाड, शिराळ, लऊळ या गावांचा शेतीचा  वीजपुरवठा सुरळीत करणेबाबत सूचना दिल्या.अखेर आ. बबन यांच्या मध्यस्थितीने महाराष्ट्र नवनिर्माण  सेनेने आपले आंदोलन स्थगीत केले.याप्रसंगी वीज मंडळाच्या अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. 


          यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिलीप धोत्रे, जिल्हाअध्यक्ष प्रशांत गिड्डे, सागर लोकरे, बाळासाहेब टोणपे, दिलीप जोशी, आकाश लांडे, सागर बंदपट्टे, सागर गरदाडे, उमेश माने, आण्णासाहेब शेटे, सोमनाथ पवार, बालाजी गाडे, खंडू बडे, समाधान कदम, सौदागर कदम, अजय टोणपे, समाधान गायकवाड, समाधान गाडे, राहुल गाडे, अरविंद टोणपे, पप्पू धुमाळ इत्यादी पदाधिकारी त्याच बरोबर अंबाड शिराळ गावचे पितांबर गाडे, विजय पाटील, चंद्रकांत टोणपे, अमित गाडे, दिलीप टोणपे, सुनील कदम, शंकर कदम, अण्णासाहेब महिंगडे,सचिन गाडे, अनिल टोणपे, गणेश कदम, विशाल गाडे, गणेश लोकरे, अमोल टोणपे असे अनेक मान्यवर पदाधिकारी यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.


Reactions

Post a Comment

0 Comments