शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडू नये अन्यथा तीव्र आंदोलनाचा रासपचा इशारा
कुर्डूवाडी ( कटुसत्य वृत्त ) :- राष्ट्रीय समाज पक्ष माढा तालुक्याच्या वतीने थकीत वीजबिल धारकांचे वीज कनेक्शन तोडू नये अन्यथा राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करेल असा इशारा उपविभागीय कार्यकारी अभियंता यांना निवेदनाद्वारे इशारा देण्यात आला.
दिलेल्या निवेदनामध्ये अधिवेशन काळात विधानसभेचे चर्चेत महावितरणद्वारे थकीत वीज बिल ग्राहकांची वीज तोडण्यास उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी थकित वीजबिल ग्राहकांची वीज तोडण्यास स्थगिती दिली होती परंतु अधिवेशन संपताच स्थगिती उठवण्यात आली व वीज तोडण्यास सुरूवात झाली या दुतोंडी व शेतकरीविरोधी महाराष्ट्र शासनाचा राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यात गतवर्षी कडक निर्बंध लावण्या आले होते.त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकवलेला माल विकता आला नाही तो रस्त्यावर टाकून देण्याची वेळ शेतकऱ्यावर आल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला असताना ऐन उन्हाळ्यात पिकांना पाण्याची गरज असताना वीज कनेक्शन तोडण्यात येत असल्याने शेतकरी तीव्र संतापलेला आहे यामुळे थकित वीजबिल ग्राहकांची विज तोडणी त्वरित थांबवण्यात यावी अन्यथा राष्ट्रीय समाज पक्ष रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असा इशारा निवेदनात दिला आहे.
यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख दिलीप गडदे, माढा विधानसभा अध्यक्ष धनाजी कोकरे ,तालुकाध्यक्ष गोरख वाकडे ,शहराध्यक्ष अभिजीत सोलंकर, महिला तालुका उपाध्यक्ष प्रियांका वाघमोडे, रासप नेते मल्हारी खरात, शाबीर चाऊस, अर्जुन शिंदे, शेतकरी दादासाहेब शिंदे, अंगत शिंदे, कानिफ परबत, शिवाजी सोनवणे, दादासाहेब सोनवणे ,आकाश शिंदे आदीसह शेतकरी उपस्थित होते.
कुर्डूवाडी येथील उपकार्यकारी अभियंता कानगुडे यांच्याशी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख दिलीप गडदे यांनी फोनवरून चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांनी एक बिल भरावे आम्ही शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट करणार नाही. वीज कनेक्शन कट करण्याचे आम्ही थांबवले आहे .शेतकऱ्यांनी एक बिल भरून सहकार्य करावे.
0 Comments