सिटीसर्व्हे व सर्कल कार्यालयात कायम अधिकाऱ्यांची नेमणूक करावी ,बसपाचे प्रांतांना निवेदन, मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा
कुर्डुवाडी ( कटुसत्य वृत्त ) :- कुर्डुवाडी शहरातील मंडल अधिकारी कार्यालयात अधिकारी उपलब्ध नसतात. अधिकाऱ्यांना विचारणा केली असता सदर अधिकाऱ्यांकडे डबल चार्ज आहेत अशा प्रकारची उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.त्यामुळे लवकरात लवकर मंडल अधिकारी कुर्डुवाडी शहरासाठी नेमण्यात यावा तसेच सिटीसर्व्हे कार्यालयात देखील अधिकाऱ्याची नेमणुक करावी व नागरिकांची होणारी गैरसोय टाळावी अन्यथा बहुजन समाज पार्टी लोकशाही मार्गाने आंदोलन करेल अशा आशयाचे निवेदन बहुजन समाज पार्टी कुर्डुवाडी शहराध्यक्ष सचिन वाळके यांनी प्रांत अधिकारी ज्योती कदम यांच्याकडे देण्यात आले आहे.
0 Comments