घाटणे पुलासाठी ६ कोटी ९२ लाख नीधी मंजूर
मोहोळ (कटुसत्य वृत्त ) :- मोहोळ तालुक्यातील घाटणे गावालगतच्या सीना नदीवरील पुलासाठी राज्य सरकारकडून ६ कोटी ९२ लाख व देखभालीसाठी १३ लाख हुन अधिक निधी मंजूर केला आहे. या पुलामुळे मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांना यांचा मोठा लाभ होणार आहे. या पुलासाठी मोहोळ चे माजी आमदार राजन पाटील यांच्या पुढाकारातून महाविकास आघाडीच्या सरकार व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कडुन मंजूर करून आणला असल्याची माहिती आमदार यशवंत माने यांनी दिली.
मोहोळ तालुक्याच्या उत्तर भागातील अनेक गावांचा संपर्क सीना नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्यावर तुटत असे. याशिवाय मोहोळ शहराच्या नजीकच्या अनेक गावांना अत्यंत सोयीचा असणारा मार्ग केवळ या पुलामुळे खंडित झाला होता. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान माजी आमदार राजन पाटील यांच्याकडे या भागातील नागरिकांनी या पुलाच्या आवश्यकतेची खंत बोलून दाखवली. याशिवाय आमदार यशवंत माने राष्ट्रवादीचे युवा नेते तथा लोकनेते कारखान्याचे चेअरमन बाळराजे पाटील यांनीही या पुलाबाबतचे आश्वासन या परिसरातील नागरिकांना दिले होते. आमदार यशवंत तात्या माने यांनी अजित दादा पवार, ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करून ग्रामसडक योजनेतून पुलासाठी निधी देण्याची मागणी केली होती. त्या पाठपुराव्याला यश आले आहे आणि या पुलाचा प्रश्न मार्गी लागला आहे.
मोहोळ तालुक्याच्या उत्तर भागातील दोन भागांना जोडणारा घाटने गावाजवळील सीना नदी वरील हा पूल गेल्या अनेक दिवसांपासून मंजुरीच्या प्रतीक्षेत होता. यासाठी माजी आमदार राजन पाटील व आमदार यशवंत माने यांनी पुढाकार घेऊन मंजुरीसाठी प्रयत्नशील होते. अखेर हा पूल मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मंजूर करण्यात आला असुन या पुलासाठी पुलासाठी ६ कोटी ९२ लाख राज्य सरकारने मंजूर केले आहेत. तर देखभालीसाठी १३ लाख होऊन अधिकचा निधी मंजूर केला आहे. यामुळे घाटणे परिसरातील जनतेमधून समाधान व्यक्त होत आहे.
मोहोळ शहराच्या उत्तरेकडील भागातील गावांशी संपर्क जोडणारा हा अत्यंत महत्त्वाच्या पुलाचा प्रश्न केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून सुटू शकला आहे. या परिसरातील आम्ही नागरिकांनी वेळोवेळी माजी आमदार राजन पाटील यांच्याकडे या महत्त्वाच्या प्रश्नाबाबत दाद मागितली होती. त्यामुळे पक्षश्रेष्ठी राजन पाटील यांच्या मुळेच हा प्रश्न सुटू शकला आहे.मोहोळ तालुक्यात माजी आ. राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली आमदार यशवंत माने यांनी विकास कामांचा सपाटा लावला आहे. यामध्येच या मंजूर पुलामुळे मोहोळ तालुक्यातील लोकांना खूप फायदा होणार आहे. तालुक्याच्या ठिकाणी जाण्याचा मार्ग अनेक ग्रामस्थांना सोपे झाले आहे. खरं तर माजी आमदार राजन पाटील व आमदार यशवंत माने यांचे आभार मानावे तितके कमी आहेत. यांच्या प्रयत्नामुळे आमचा प्रवास सुखाचा होणार आहे.
- ऋतुराज देशमुख
नूतन सरपंच, घाटणे
0 Comments