Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रभाग क्र. 11 मधून केली सुदर्शन गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीची मागणी पक्षाने संधी दिल्यास प्रभागाचा सर्वांगीन कायापालट करू - सुदर्शन गायकवाड

 प्रभाग क्र. 11 मधून केली सुदर्शन गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीची मागणी
पक्षाने संधी दिल्यास प्रभागाचा सर्वांगीन कायापालट करू - सुदर्शन गायकवाड 

                                        

मोहोळ (कटुसत्य वृत्त ) : -  राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आणि छावा संघटनेचे अध्यक्ष तथा अभ्यासू सामाजिक कार्यकर्ते सुदर्शन गायकवाड यांनी प्रभाग क्रमांक ११ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारीची मागणी केली आहे. माजी आमदार राजन पाटील, आमदार यशवंत तात्या माने, युवा नेते बाळराजे पाटील,अजिंक्यराणा पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादीच्या युवा आघाडी मध्ये सुदर्शन गायकवाड हे कार्यरत आहेत. माजी आमदार राजन पाटील यांची भेट घेऊन त्यांनी रीतसर उमेदवारीची मागणी यापूर्वी केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेल्या आवाहनानुसार मोहोळ येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रकाश भाऊ चवरे यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुदर्शन गायकवाड यांनी उमेदवारीची मागणी केली आहे.
प्रभाग क्रमांक 11 हा गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेचा बालेकिल्ला आहे.प्रत्यक्षात या भागात काहीच कामे नसल्याचा दावा सुदर्शन गायकवाड यांनी करत या प्रभागातून राष्ट्रवादीकडून उमेदवारी घेऊन निवडणूक लढविण्याचा इरादा जाहीर केला होता. या प्रभागातील अनेक नागरिकांनी कार्यकर्त्यांनी सुदर्शन गायकवाड यांना भेटून आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी घेऊन निवडणूक लढवावी अशी विनंती केली होती. सुदर्शन गायकवाड हे मोहोळ शहराच्या राजकीय क्षेत्रात गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत आहेत .  छावा संघटनेच्या माध्यमातून समाजाचे विविध प्रश्न मार्गी लावण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी नक्कीच सुदर्शन गायकवाड यांना या निवडणुकीत संधी देऊ शकतात.
चौकट
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच प्रभाग क्रमांक अकराचा विकासात्मक चेहरामोहरा बदलू शकतो. माजी आमदार राजन पाटील, आमदार यशवंत माने यांच्या माध्यमातून प्रभागासाठी जास्तीत जास्त निधी खेचून आणता यावा यासाठीच माझी उमेदवारी असणार आहे. पक्षाने मला संधी दिल्यास नक्कीच या संधीचं सोनं करून प्रभाग क्रमांक 11 हा मोहोळ शहरात सर्वाधिक विकसित प्रभाग बनवण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. मी माझी रीतसर उमेदवारीची मागणी पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे यांच्याकडे केली आहे. याशिवाय आमचे नेते आणि पक्षश्रेष्ठी राजन पाटील यांना मी प्रत्यक्ष भेटून मला संधी देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी नक्कीच मला संधी देऊन या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून उमेदवारी देतील असा मला विश्वास वाटतो.
सुदर्शनभाऊ गायकवाड
युवा नेते राष्ट्रवादी काँग्रेस



Reactions

Post a Comment

0 Comments