Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रभाग सात मधुन राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षा यशोदाताई कांबळे यांनी केली उमेदवारीची मागणी.. गेल्या अनेक वर्षापासूनच्या पक्षनिष्ठेचे फळ कांबळे यांना मिळणार का ?

 प्रभाग सात मधुन राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षा यशोदाताई कांबळे यांनी केली उमेदवारीची मागणी.. गेल्या अनेक वर्षापासूनच्या पक्षनिष्ठेचे फळ कांबळे यांना मिळणार का ?

मोहोळ (कटूसत्य वृत्त ) :- मोहोळ नगरपरिषदच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाकडून इच्छुक उमेदवारांची मागणीची संख्या मोठ्या प्रमाणात  वाढत आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महिला आघाडीच्या मोहोळ शहराध्यक्ष यशोदा कांबळे यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहून मोहोळ तालुक्यामध्ये महिला आघाडीच्या माध्यमातून पक्षाला सक्षमीकरण करण्यासाठी प्रयत्न केला आहे. राष्ट्रवादी महिला आघाडी शहराध्यक्ष यशोदा कांबळे यांनी वार्ड क्रमांक सात मधून राखीव जागेवर उमेदवाराची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे यांच्याकडे केली आहे.
यशोदाताई कांबळे यांनी मोहोळ शहर आणि तालुक्यातील महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी पक्ष कार्यात भरीव योगदान दिले आहे. पक्ष स्तरावर आवाहन करण्यात आलेले सर्व सामाजिक उपक्रम अगदी हिरिरीने आणि उत्साही भावनेने पार पाडणाऱ्या एक प्रामाणिक पदाधिकारी म्हणून त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात परिचित आहेत. गत वेळीही त्यांनी निवडणुकीसाठी उमेदवारी मागितली होती. मात्र पक्षश्रेष्ठींनी त्यांना पुढील निवडणुकीसाठी आश्वासन दिल्याने त्यांनी निष्ठेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचारात सहभागी होऊन पक्षाच्या विजयासाठी प्रामाणिक प्रयत्न केले.
सतत सामाजिक कामांमध्ये अग्रेसर असल्याने त्यांच्या कामाची दखल घेत पक्षाने महिला आघाडीच्या शहराध्यक्षपदी नियुक्ती केली.मध्यंतर काळामध्ये पक्ष सत्तेत नसतानाही पक्षाची ध्येय धोरणे राबविणे,सतत अन्याय विरुद्ध न्याय मिळवून देण्याची भूमिका घेतली आहे. शहरातील कोणत्याही महिला भगिनींचा  कोणत्याही स्वरूपाचे अडचण असली की विविध प्रशासकीय कार्यालयात अगदी पोटतिडकीने कांबळे हजर असतात त्यामुळे कांबळे पक्षसंघटनेत अत्यंत कर्तव्यदक्ष आणि  सर्वसामान्यांच्या न्यायासाठी मेहनत घेणाऱ्या आहेत. याची दखल पक्षश्रेष्ठींनी देखील वेळोवेळी घेतली आहे त्यामुळे यशोदा कांबळे यांना पक्षश्रेष्ठी नक्की संधी देतील अशी अपेक्षा महिला कार्यकर्त्यांना आहे.
पक्ष माझ्या उमेदवारीचा विचार नक्कीच करेल असा मला विश्वास वाटतो . पक्षाने संधी दिल्यास निवडणूकही जिंकून दाखवू.गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत पक्षाच्या निर्णयाला आणि पक्षश्रेष्ठींना दिलेल्या शब्दाशी सहमत राहून निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी निवडणुकीत  प्रामाणिकपणे आणि निष्ठेने प्रचार करून आमच्या पूर्वेकडील भागात उमेदवारांच्या विजयासाठी मेहनत घेतली आहे. समाजकारणाच्या माध्यमातून राजकारणाचा प्रवास करत राहणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादीच्या माध्यमातून महिलांच्या विविध प्रश्नांसाठी मी आमचे नेते तथा माजी आमदार राजन पाटील, आमदार यशवंत तात्या माने, आमच्या मार्गदर्शिका राजश्रीताई राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि युवा नेते बाळराजे पाटील,अजिंक्यराणा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे. मला जर या प्रभागातून उमेदवारी दिली तर माजी आमदार राजन पाटील यांनी दिलेल्या संधीचे सोने नक्कीच प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्नशील राहीन.
यशोदाताई कांबळे 
शहराध्यक्ष 
राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडी

Reactions

Post a Comment

0 Comments