Hot Posts

6/recent/ticker-posts

येत्या 15 मार्च पर्यंत सर्व दिव्यांगांनी निधी वाटपाचे फॉर्म भरून द्यावे - प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुका अध्यक्ष मनोज धोत्रे यांचे आवाहन

 येत्या 15 मार्च पर्यंत सर्व दिव्यांगांनी निधी वाटपाचे फॉर्म भरून द्यावे - प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुका अध्यक्ष मनोज धोत्रे यांचे आवाहन

मोहोळ (कटूसत्य वृत्त ) :- मोहोळ नगर परिषदेअंतर्गत मोहोळ शहरातील दिव्यांगांना वितरित केल्या जाणाऱ्या पाच टक्के निधी वाटपाचे फार्म सर्व दिव्यांग बांधवांनी येत्या 15 मार्चपूर्वी नगर परिषदेमध्ये येऊन भरून दयावे यासाठीच्या मार्गदर्शनाची दिव्यांग संघटनेची महत्वपूर्ण बैठक प्रहार दिव्यांग संघटनेच्या माध्यमातून मोहोळ नगरपरिषदेच्या उद्यानात पार पडली. यावेळी शहरासह परिसरातील दिव्यांग संघटनेचे सर्व सदस्य पदाधिकारी आणि बहुसंख्येने दिव्यांग उपस्थित होते. यावेळी प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष मनोज धोत्रे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. मोहोळ शहर परिसरात जवळपास 120 अंदाजे दिव्यांग बांधव व इतर सर्व बांधवापर्यंत हा संदेश जाणे गरजेचे असल्याने प्रत्येक दिव्यांगांने आपापल्या परिसरातील दिव्यांगांना हा महत्त्वपूर्ण फॉर्म भरण्यासाठी उद्युक्त करावे असे आवाहन मनोज धोत्रे यांनी केले.
यावेळी पिंटू महाराज शेगर, महिला दिव्यांग संघटनेच्या तालुकाध्यक्ष अनिता बळवंतराव, भैरवनाथ काळे, सुनील माने, नजीर शेख, कालिदास शेटे,  शहराध्यक्ष रोहिदास पवार, अण्णा चव्हाण, काझी मॅडम, मनोज ठोंबरे, मनोज खिल्लारे गणेश शिंदे तुकाराम सरक कोंडाजी कुरेशी दत्तात्रय भांगे मामा, गोपीनाथ पवार दिगंबर होनमाने, संभाजी काळे पोपट कोरे माजिद बागवान राजेंद्र लोहार इत्यादी सह मोहोळ शहर परिसरातील दिव्यांग बांधव आणि प्रहार दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी सूत्रसंचालन आणि आभार स्वतःला तालुकाध्यक्ष मनोज धोत्रे यांनी मानले

Reactions

Post a Comment

0 Comments