खंडाळीत डाॅ.आबासाहेब देशमुख यांचा सेवानिवृत्त निमित्ताने सत्कार
अकलूज (कटुसत्य वृत्त ) :- शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.आबासाहेब देशमुख यांचा सेवानिवृत्ती निमित्ताने खंडाळी (ता.माळशिरस ) येथे ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.आबासाहेब देशमुख यांनी गेली ४० वर्षे सेवेच्या काळात विद्यार्थ्यांसाठी व संस्थेसाठी मोठे योगदान दिले. त्याकडे अडचण व मदत मागण्यांसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना कधी विनमुख होऊन पाठवले नाही. प्रत्येक समस्येचे विद्यार्थ्यांचे समाधान हाच त्यांचा हातखंडा होता. त्याच्या काळात अनेक विद्यार्थी उच्च पदस्थ आधिकरी झाले. डाॅ.आबासाहेबांनी त्यांच्या सेवा काळात विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांनी केलेल्या कामातून उतराई होण्यासाठी खंडाळी ग्रामस्थांनी त्यांचा सहृदय सत्कार करण्यात आला यावेळी मा.चेअरमन राजेंद्र पताळे, शेतकी अधिकारी कल्याण पताळे,चेअरमन नामदेव पताळे , व्हा.चेअरमन अविनाश पताळे, जनसेवेचे जिल्ह्य उपाध्यक्ष शहाजीअप्पा पताळे,बापूसाहेब गायकवाड, नानासो चंदनकर, अशोकअण्णा पताळे, महावीर पताळे, ग्रंथपाल डी एस.पाटील ,राजू गोसावी, मुबारक आतार, तानाजी मोरे,शरद भोसले, सिकंदर तांबोळी, जयसिंग खरात,नारायण पताळे, महादेव साबळे, श्रीकांत वाघमारे, सुहास पताळे, अजय पाटील, प्रकाश पताळे,शंतनू पताळे, आकाश पताळे, आदी उपस्थित होते.
0 Comments