31 मार्चपर्यंत वारस नोंदी पूर्ण करणार - जिल्हा तलाठी संघाचा निर्णय
सोलापूर (कटुसत्य वृत्त ) :- जिल्हा तलाठी संघाची बैठक संघाचे अध्यक्ष राजकुमार पांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली बार्शी येथे पार पडली असून बैठकीमध्ये 31 मार्च 2021 पर्यंत न्यायालयीन प्रकरणे वगळून सर्व मयत खातेदारांच्या वारस नोंदी पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बैठकीला संघाचे तालुकाध्यक्ष, तलाठी, मंडळ अधिकारी उपस्थित होते. 1 मार्च ते 31 मार्च 2021 या कालावधीत संबंधित गावच्या तलाठी कार्यालयात गाव नमुना नं 8 अ चे वाचन करून मयत खातेदारांचा शोध घेऊन नोंदी निर्गत केल्या जाणार आहेत.
नागरिकांनी 1 ते 5 मार्च 2021 या कालावधीत गावचे तलाठी कार्यालयात मयत खातेदारांचा मृत्यू दाखला, वारसाबाबतचे प्रतिज्ञापत्र/कोर्टाचे वारस प्रमाणपत्र आणि आवश्यक कागदपत्रासह उपस्थित राहून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन तलाठी संघाने केले आहे.
0 Comments