जागतिक महिला दिनानिमित्त ब्युटी पार्लर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन
सोलापूर (कटुसत्य वृत्त ) :- जागतिक महिला दिनानिमित्त 7 मार्च रोजी सकाळी 11 ते 4 या कालावधीत अशोक चौक येथे शिवबा संपर्क कार्यालय येथे मोफत त्वचा सौंदर्य उपचार व सौंदर्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरामध्ये पंधरा दिवस मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये डॉ स्वप्नाच्या कटेकरी यांनी दिली.
या शिबिराचे आयोजन महर्षी मार्कंडेय जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ सोलापूर यांच्या विद्यमाने महिलांसाठी उपक्रम आयोजित करण्यात आला आहे या शिबिरामध्ये सहभागी होणार्या महिलांना पुढील उपचारांमध्ये 50 टक्के सवलत मिळणार आहे महिलांना असणाऱ्या सौंदर्याविषयी सर्व माहिती देण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेच्या वेळी सौ माधवी बलमेर, सौ वसुधा गुरव हे उपस्थित होते
0 Comments