Hot Posts

6/recent/ticker-posts

महिला दिनानिमित्त मोफत योगा आणि दंत चिकित्सा शिबिराचे आयोजन

 महिला दिनानिमित्त मोफत योगा आणि दंत चिकित्सा शिबिराचे आयोजन

सोलापूर ( कटूसत्य वृत्त ) :- जागतिक महिला दिनाचे पोचते साधून मोफत आरोग्य तपासणी तांत्रिक तपासणी आणि योग शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती होमिओपॅथिक तज्ञ डॉ समीर गोळवलकर , सौ कीर्ती गोळवळकर योगा प्रशिक्षक सौ अनिता कोडमूर आणि डेंटिस्ट डॉ चंद्रहास भुजंग यांनी पत्रकार परिषदेत दिली.  

             सदर शिबिराचे आयोजन 8 मार्च ते 15 मार्च या दरम्यान करण्यात आले आहे या शिबिरामध्ये होमिओपॅथिक क्यू आर अंड केअर सेंटर यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी सर्व रोग निदान आणि वैद्यकीय सल्ला मोफत दिला जाणार आहे. यामध्ये महिलांचे सर्व समस्या गर्भाशयाच्या , पाळीच्या तक्रारी तसेच पित्ताचा आजार सांधीवात मुळव्याध, मुतखडा, त्वचा रोग, सौंदर्य समस्या,श्‍वसनाचे विकार आणि लहान मुलांच्या आरोग्याच्या समस्या आदी आजारावर मोफत तपासणी आणि वैद्यकीय सल्ला दिला जाणार आहे. या शिबिरांमध्ये होणाऱ्या रुग्णाला पुढील उपचारासाठी सोनोग्राफी तपासणी विशेष सवलत दिली जाईल सीबी डेंटल क्लिनिक यांच्यावतीने संतांचे विकार यांचे समस्येचे मोफत तपासणी व सल्ला दिला जाणार आहे.

             दातांच्या समस्या तसेच कवळी हिरड्याचे शस्त्रक्रिया आदी सर्वउपचार मध्ये विशेष सवलती दिले जाणार आहे अशी माहिती या पत्रकार परिषदेमध्ये दिली या आरोग्य

                शिबिराचे आयोजन सीबी डेंटल क्लिनिक शॉप आर. एन.गोली सेलिब्रेशन अपारमेंट जिन्स कॉर्नर अशोक चौक येथे होणार आहे.या पत्रकार परिषदेच्या वेळी डाँ समीर गोळवळकर डॉ चंद्रहास भुजंग सौ अनिता कोडमूर हे उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments