Hot Posts

6/recent/ticker-posts

सांगोला तालुक्यातील खातेदारांना मिळणार ७/१२ डिजिटल उतारा--नायब तहसिलदार किशोर बडवे

 सांगोला तालुक्यातील खातेदारांना मिळणार ७/१२ डिजिटल उतारा--नायब तहसिलदार किशोर बडवे

 सांगोला  (कटुसत्य वृत्त )  :-   जमिनीच्या संबंधित महत्त्वाचा पुरावा म्हणून समजल्या जाणाऱ्या ७/१२ उताऱ्यामध्ये आता मोठे बदल करण्यात आले आहेत . आता खातेदारांना डिजिटल स्वाक्षरी ७/१२ उतारे मिळणार आहेत. ७/२२ उतारावर सही शिक्क्यासाठी पुन्हा तलाठ्याकडे उतारे घेऊन जाण्याची गरज पडणार नाही . तर ऑनलाइन पद्धतीने खातेदारांना स्वाक्षरी चे ७/१२ उतारा मिळणार आहेत . यामुळे खातेदारांना सहजरीत्या उतारे उपलब्ध होणार आहेत . घरबसल्या नागरिकांना ७/१२ उतारा मिळवता यावा याकरिता , सांगोला तालुक्यातील १०४ गावचे ७/१२ उतारे संगणकीकृत करण्यात आले आहेत . तालुक्यातील १०४ महसुली गावामधील ७/१२ उता-यांची  एकूण १ लाख २२ हजार ८६९  गटांची संख्या आहे .त्यापैकी १ लाख २२ हजार ३५५ गटाचे ७/१२ उतारे तयार करून नागरिकांसाठी ऑनलाईन डिजिटल स्वाक्षरीने  उपलब्ध करून देण्यात आले आहेत . त्यामुळे  खातेदारांना सहजरित्या ७/१२ उतारे उपलब्ध होणार आहेत . उर्वरित ५१४ गट अद्याप ऑनलाईन करण्याचे काम प्रलंबित आहे . यामधील अडीअडचणी १ ते ४१ अहवाल म्हणजेच , क्षेत्राचा मेळ घेणे , सहहिस्सेदारांच्या  हरकतीचे निराकरण करणे हे काम सध्या महसूल प्रशासन करीत आहे. यासाठी  गुरुवार दिनांक ४ व शुक्रवार दिनांक ५ रोजी ओडिसी व डी.एस. डी अहवाल निर्गत करण्यासाठी पु . अहिल्यादेवी होळकर सभागृह येथे कॅम्प सुरू आहे . तसेच सांगोला तालुक्यातील एकूण खरेदी झालेल्या नोंदी घेणे, बँक बोजा, वारस नोंदी या प्रकारच्या ८९० नोंदी प्रलंबित असून यापैकी तात्काळ निर्गत होणाऱ्या ६२९ नोंदी या दोन दिवसाच्या कॅम्प मध्ये निर्गत करण्यासाठी सर्व मंडळ अधिकारी व गाव कामगार तलाठी यांच्यामार्फत कारवाई सुरू आहे . यापैकी २६१ नोंदीवर खातेदारांनी हरकती घेतल्या आहेत. त्यावर सुनावणी घेऊन मंडळाधिकारी यांना नोंदी निर्गत करण्याचे आदेश तहसीलदार अभिजित पाटील यांनी दिले असल्याचे नायब तहसीलदार किशोर बडवे यांनी सांगितले आहे.सध्या जिथे तिथे ऑनलाईन ७/१२ उतारा मागितला जात असला तरी शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन सातबारा उतारा मिळवणं ही मोठी जिकीरीची बाब आहे . अनेक ठिकाणी इंटरनेट स्पीड , वीज अशा सुविधांचा अभाव आहे . त्यातही ऑनलाईन ७/१२ उताऱ्याची प्रिंट मिळाली तरी तो आहे तसा बँक किंवा कोर्टाच्या कामकाजात वापरता येत नाही . त्यावर पुन्हा तलाठ्यांचा सहीशिक्का आवश्यक असतो . त्यासाठी पुन्हा तलाठ्याकडे जावंच लागत होत .  ऑनलाईन ७/१२ उतारा हा सोईपेक्षा अडचण जास्त असला तरी अनेक ठिकाणी ऑनलाईन ७/१२ सक्तीचा करण्यात आला आहे . यामुळे खातेदारांची मोठी धावपळ होते . तसेच सातबारा उताऱ्यावर सही मिळवण्यासाठी गाव कामगार तलाठी यांची प्रतीक्षा करावी लागत होती . शेतकऱ्यांच्या या अडचणीवर उपाय म्हणून आता तलाठ्याची डिजीटल स्वाक्षरी असलेला ७/१२ उतारा मिळायला सुरूवात होणार आहे . कोणत्याही शेत जमिनीची अथवा बिगरशेती प्लॉटची मालकी सिद्ध करण्यासाठी ७/१२ उतारा हा अत्यंत महत्वाचा दस्तावेज मानला जातो . सरकारी कार्यालये , बँका आणि कोर्ट कचेरीच्या कामात या ७/१२ उताऱ्याचं महत्व  आहे.७/१२ उतारा गावकामगार तलाठ्याकडून मिळवावा लागत होता. गेल्या काही वर्षांपासून ७/१२  उतारा महाभूमिलेखच्या वेबसाईटवरून डाऊनलोड करून घ्यावा लागतो . त्यात अनेक त्रुटी असल्या किंवा अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या मालकी हक्काची शासकीय संगणकात नोंद झालेली नसली तरी ऑनलाईन उतारा अनेक ठिकाणी सक्तीचा करण्यात आला आहे . मात्र त्यातील सर्वात महत्वाची त्रुटी म्हणजे सध्या उपलब्ध असलेल्या ऑनलाईन ७/१२ उताऱ्यावर या उताऱ्याची प्रत शासकीय , बँका तसंच कोर्टाच्या कामकाजासाठी ग्राह्य धरली जाणार नाही असा वैधानिक इशारा असतो . त्यामुळे त्यावर उपाय म्हणून ७/१२ उताऱ्याच्या ऑनलाईन प्रिंटवर तलाठ्याचा सही शिक्का आणण्याचा पर्याय देण्यात आला . मात्र आता डिजिटल स्वाक्षरी ७/१२ उता-यावर सही शिक्क्या घेण्यासाठी पुन्हा तलाठ्याकडे ७/१२ घेऊन जाण्याची गरज पडणार नाही . यामुळे नागरिकांना आता सहजरीत्या ७/१२ उतारा उपलब्ध होणार आहे . असे नायब तहसीलदार किशोर बडवे यांनी सांगितले आहे .

Reactions

Post a Comment

0 Comments