अॅड.प्रेमनाथ सोनवणे यांची बसपा जिल्हा उपाध्यक्ष पदी निवडसौंदणे ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव
सौंदणे ( कटूसत्य वृत्त ):- सौंदणे गावचे सामाजिक कार्यकर्ते अॅड.प्रेमनाथ सोनवणे यांची सोलापूर जिल्हा बहुजन समाज पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली असून यामुळे गावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
सोलापूरमध्ये नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये बसपा प्रदेश अध्यक्ष डॉ.संदीप तांजणे यांच्या आदेशावरुन ही निवड करण्यात आली.यावेळी प्रदेश सचिव आप्पासाहेब लोकरे,जिल्हाध्यक्ष मिलिंद बनसोडे,सर्व जिल्हा व शहर पदाधिकारी उपस्थित होते.
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत वकिलीबरोबरच पत्रकारितेचेही शिक्षण घेतलेल्या अॅड.प्रेमनाथ सोनवणे यांना सामाजिक बांधिलकीची चांगलीच जाण असून त्यांचे सामाजिक कार्यही उल्लेखनीय असे आहे.समाजकारणाबरोबरच राजकारणातही रस असल्याने त्यांनी यापूर्वी बसपा मोहोळ विधानसभा अध्यक्ष,मोहोळ विधानसभा प्रभारी व जिल्हा सचिव अशी अनेक पदे भुषवलेली आहेत.याशिवाय ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर विधी मंचच्या जिल्हा उपाध्यक्ष पदीही कार्यरत आहेत.तसेच जिल्ह्यातील प्रत्येक निवडणूकीत त्यांचा सक्रीय सहभाग असतो.
या निवडीबद्दल सौंदणे ग्रामस्थांमधून आनंद व्यक्त केला जात असून अॅड.प्रेमनाथ सोनवणे यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
तसा माझा मूळ पिंड हा समाजकारणाचा असून गोरगरीब,कष्टकरी लोकांच्या अडीअडचणी सोडवण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो.पण समाजकारणाला राजकारणाची जोड असेल तर समाज कार्य करताना जास्त अडचणींचा सामना करावा लागत नाही.आणि म्हणूनच सामाजिक कार्य करत असताना या पदालाही न्याय देण्याचा माझा प्रयत्न राहील.
अॅड.प्रेमनाथ सोनवणे
उपाध्यक्ष
बसपा,सोलापूर
0 Comments