लढायांपलीकडले शिवाजी महाराज सुद्धा लोकांना कळले पाहीजेत - श्रीमंत कोकाटे
करमाळा ( कटूसत्य वृत्त ) :- लढायांपलीकडले शिवाजी महाराज सुद्धा लोकांना कळले पाहीजेत आहे प्रतिपादन इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांनी शेटफळ तालुका करमाळा येथे शिवजयंती निमित्त आयोजित व्याख्यानात बोलताना केले.
पुढे बोलताना ते म्हणाले की फक्त अफजलखानाचा वध, शाहिस्तेखानची फजीती. आग्रहावरून सुटका, म्हणजेच शिवचरित्र नव्हे तर शिवाजी महाराजांचे शेतीविषयक धोरण, विज्ञानवादी , दृष्टिकोन सामाजिक समानताही महत्वाची आहे. शिवरायांच्या काळात स्त्रियांना पुर्ण संरक्षण होतं, त्यांचा आदर केला जात होता. शिवरायांची लढाई ही हिंदू मुस्लिम लढाई नव्हती .रामदास शिवरायांचे गुरू कधीच न्हवते .आई जिजाऊसाहेब व वडील शाहाजीराजे व संत तुकाराम महाराज हेच शिवरायचे गुरू होते . दुर्दैवाने आजपर्यंत शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहासच लोकांपर्यंत पोहोचवला गेला खरा इतिहास समाजापर्यंत पोहोचवण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले .महिलांमध्ये व्रतवैकल्ये उपवास तपास यामुळे स्त्रियांचे आरोग्य धोक्यात आले असून त्यांच्यात अंधश्रद्धा वाढत आहेत. स्फूर्तिदायी प्रेरणादायी इतिहास घडण्यासाठी घराघरात जिजाऊ, अहिल्यादेवी तयार होण्याची नितांत गरज असल्याचे त्यांनी सांगितले यांनी केले. या कार्यक्रमाला सरपंच विकास गुंड , आनंद नाईकनवरे, शिवाजी पोळ, पांडुरंग लबडे, काकासाहेब गुंड, संभाजी ब्रिगेडचे पुणे विभागीय कार्याध्यक्ष नितीन खटके,, दिपक पाटील ,डॉ सारंगकर, डॉ वीर ,बाळासाहेब झोळ, बाळासाहेब तोरमल, अशोक पोळ,सुहास पोळ, विकास पोळ,नानासाहेब पोळ राजेंद्र पोळ, गणेश नाईकनवरे, मुरलीधर पोळ, पांडुरंग घाडगे, राकेश पाटील, अत्तुल निर्मळ, सुहास शिंदे, भाऊसाहेब साबळे, अमित घोगरे, शंकर पोळ, महेश बोराडे ,आबासो लबडे, ज्ञानेश्वर पोळ, विशाल पोळ, चेतन पोळ भाग्यवंत पोळ,सत्यम सुरवसे ,यांचेसह गावातील ग्रामस्थ शिवप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते.
0 Comments