कवी कुसुमाग्रजांची जयंती व मराठी राजभाषादिनानिमित्त कवी समेंलन उत्साहात साजरे
अकलूज ( कटूसत्य वृत्त ) :- येथील विजयसिंह मोहिते -पाटील सार्वजनिक वाचनालयात आज कवी कुसुमाग्रज यांची जयंती वाचनालयाचे अध्यक्ष मा श्री मदनसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात व कोविड चे सर्व नियम पाळून साजरी करण्यात आली. प्रांरभी कविवर्य कुसुमाग्रज,माळशिरस तालुक्याचे भाग्यविधाते सहकार महर्षी कै.शंकरराव मोहिते पाटील व कै. रत्नप्रभादेवी मोहिते पाटील व ग्रंथालय शास्त्र चे जनक डॉ.रंगनाथन यांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. आज मराठी राजभाषादिनानिमित्त वाचनालयाच्या वतीने कवी संमेनलाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये डॉ.पांडुरंग नलावडे ,डॉ.प्रेमनाथ रामदासी,जयंत बोबडे, विरेंद्र पत्की,राजाराम गुजर व सुहास उरवणे या कवींच्या कवितेंचा बहारदार कार्यक्रम संपन्न झाला. काळजामधे रेंज पाहीजे या काव्यपंक्तींनी सर्व रसिकांची मने जिंकून गुजर सरांनी दाद मिळवत डॉ.रामदासी यांनी संघर्ष व डॉ.नलवडे यांनी समाजातील सत्यता मांडणाऱ्या कविता सादर केल्या,विरेंद्र पत्की यांनी सैरभैर केले तर कवी जयंत बोबडे यांनी अध्यात्मिक टच दिला, डॉ.नलवडे यांची नाची ही कविता प्रेक्षकाच्या टाळ्या मिळवत काळजात स्पर्श करित गेली.या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रकाश कांबळे सरानी केले व सूत्रसंचालन हास्य कवी सुहास उरवणे सर यांनी बहारदारपणे केले.या कार्यक्रमानिमित्त जिल्हा ग्रंथालय संघाचे संचालक रेवण भोसले, तालुका संघाचे उपाध्यक्ष उमाजी माने, नितीन बनकर, प्रमोद टोणपे, साहित्यिक गणपत जाधव, अभिनेते अनिल जाधव, बापूसाहेब सोनवणे,श्रीकांत राऊत,बंडू खडतरे,किरण डोंगरे, अमोल शिंदे, दत्तात्रय कोरे,अतुल शेटे,शिवाजी नाळे हे रसिक श्रोते व वाचक उपस्थित होते.कार्यक्रम पार पडण्यासाठी ग्रंथालयाचे कर्मचारी ग्रंथपाल संभाजी कांबळे,दत्तात्रय पाटोळे व चैतन्य अवघडे, अथर्व कांबळे,लाला खंडागळे, रवी एकतपूरे यानी परिश्रम घेतले.
0 Comments