Hot Posts

6/recent/ticker-posts

टायगर ग्रुपच्या वतीने रुग्णांना फळे व मिठाईचे वाटप.. आगळा वेगळा उपक्रम राबवत केले शिवरायांना अभिवादन

 टायगर ग्रुपच्या वतीने रुग्णांना फळे व मिठाईचे वाटप..
आगळा वेगळा उपक्रम राबवत केले शिवरायांना अभिवादन



कुर्डुवाडी (कटुसत्य वृत्त ) :- नेहमीच गरजूंना मदतीचा हात देणारी संघटना म्हणून सबंध महाराष्ट्राला परिचयाची असणाऱ्या टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने टायगर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष तानाजीभाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून प्राथमिक आरोग्य केंद्र माढा येथे रुग्णांना फळे व मिठाईचे वाटप करण्यात आले.एक आगळा वेगळा उपक्रम राबवत छत्रपती शिवरायांची जयंती टायगर ग्रुपच्या वतीने साजरी करत अभिवादन करण्यात आले.
     याप्रसंगी डॉ. एस.पी.व्हनकवळस,परिचारिका ए.एम.कांबळे,जाधवर एस.एम.मैंद,टायगर ग्रुपचे रवी आठवले,दत्ता भोसले,आकाश ओहोळ,बबलू कांबळे, विवेक आठवले, अमोल ढावरे भारत कोटियाना,अमित सूनसुना,अजिंक्य मोहिते आदी उपस्थित होते.टायगर ग्रुपच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments