विधानसभेचे प्रमाणे नगरपरिषद निवडणुकीतही होणार राष्ट्रवादीच्या संघटन क्षमतेची सत्वपरीक्षागटबाजीच्या वजाबाकीकडे दुर्लक्ष करत विकासाच्या बेरजेकडे लक्षसंयमी राजन पाटील यांची भुमिका निर्णायकच
मोहोळ ( कटूसत्य वृत्त ) :- मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीसाठीचे राजकीय पडघम आता अनेक वेगाने वाजू लागले आहेत. राष्ट्रवादी आणि शिवसेना या परंपरागत प्रतिस्पर्धी यापेक्षा आणखी काही पक्ष या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची चिन्हे आहेत. मात्र सर्वात परिपक्व आणि संयमी धोरणाचा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने लोकशाही मार्गाने उमेदवारी देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी पक्षाकडून इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले आहेत. गत निवडणुकीच्या वेळी उमेदवारी वाटपामध्ये काही चाणाक्ष सल्लागारांनी सावळागोंधळ घालत पक्षश्रेष्ठींशी देखील दिशाभूल केली होती. याचा मोठा फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसला. त्यामुळे केवळ चार जागा पक्षाला जिंकता आल्या तरीही चार जागावर सत्ता स्थापन करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शेवटपर्यंत अकरा सदस्य सोबत ठेवण्यामध्ये यश मिळवले.मोहोळ शहराचे राजकारण राजन पाटील यांच्या व्युव्हरचने आणि धोरणाशिवाय आजवर कधी पूर्णच होऊ शकले नाही. राजन पाटील यांनी अनेकांना आजवर विविध पदावर संधी देत किंगमेकर होण्याची भूमिका अगदी कौशल्याने वटवली.
मोहोळ शहराला जास्तीत जास्त निधी खेचून आणण्यासाठी माजी आमदार राजन पाटील आणि विद्यमान आमदार यशवंत माने या जोडीने केलेले प्रयत्न निश्चितपणे मोलाचे ठरले. त्यामुळे यापुढील काळात ही सत्तेसोबत आणि नेत्यांसोबत राहण्याची भूमिका काही कार्यकर्त्यांनी खंबीरपणे घेतली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी घेण्याचे प्रयत्न इच्छुकांचे सुरू झाले आहेत. त्यामुळे मोहोळ विधानसभेच्या निवडणुकीप्रमाणे मोहोळ नगरपरिषदेची निवडणूक देखील राष्ट्रवादीच्या सामर्थ्याच्या सत्वपरीक्षेची ठरणार आहे.
आजवर बऱ्याच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मोहोळ शहरातील बहुतांश मतदारांनी राष्ट्रवादीच्या विरोधात राहणं पसंत केलं. तरीही ही खंत राजन पाटील यांनी कधी जाहीर सभेत बोलून दाखवली नाही. तरीही विधानसभेला आलेल्या विकासाच्या सत्तेच्या लेटरपॅडची शिफारस पत्रे सर्वात जास्त मोहोळ शहरासाठी देण्याचे मनाचे मोठेपण त्यांनी आजवर दाखवले.आज मोहोळ शहरामध्ये बहुतांश शॉपिंग सेंटर अस्तीत्वात आहेत ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काळात बांधण्यात आलेली आहेत. सध्या संपूर्ण मोहोळ शहराचा कारभार ज्या नगर परिषदेच्या कार्यालयातून चालतो जिथून कोट्यावधी रुपयांचा निधी आपापल्या भागात नेऊन अनेक जण विकाससम्राट झाले त्या नगर परिषदेची इमारत ही राजन पाटील यांच्या सत्ता कालावधीत बांधण्यात आली आहे.विधानसभा निवडणुकीला विरोधात कोण गेले हे न पाहता आपल्या सोबत कोण आहेत या बेरजेचे राजकारण याचा हिशोब मनात घेत त्यांनी निवडणूक लढवली आणि विक्रमी मतांनी आमदार यशवंत माने यांना विजयी केले.
क्रमश:
आजच्या आधुनिक राजकारणामध्ये हायप्रोफाईल नेतेगिरी पेक्षा ग्राउंड लेव्हलला जनसंपर्क असणारे कार्यकर्तेच उच्च नेतृत्व क्षमते पर्यंत पोहोचू शकतात. दिखावे पे मत जावो अकल लगाओ आणि सादगी मेही जिंदगी या धोरणाने आपापल्या गावात पक्ष निष्ठेने काम करणाऱ्या जिगरबाज कार्यकर्त्यांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस हा मोहोळ विधानसभा मतदारसंघातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. यापूर्वीच्या दोन विधानसभा निवडणुकीच्या वेळी प्रचाराचे मुख्य
कारभारपण कुणाकडे असावे ? याबाबत बारामती दरबारी काही जणांनी दादही मागितली. मात्र गेल्या 40 वर्षांपासून मोहोळ मतदार संघाच्या राजकारणाची नस ना नस माहिती असलेल्या आणि अनेक राजकीय उन्हाळे-पावसाळे खाल्लेल्या राजन पाटील यांच्याकडेच तालुक्याची सत्तासूत्रे आणि प्रचारसूत्रे राहतील असा खंबीर निर्णय पक्षश्रेष्ठी शरद पवार आणि अजितदादा पवार यांनी दिल्यामुळे राजन पाटील मतदारसंघ आरक्षित होऊनही सलग तीन टर्म कुशल किंगमेकर ठरू शकले.
0 Comments