अकलूज ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पायल मोरे तर उपसरपंचपदी शिवतेजसिंह मोहिते-पाटील
अकलूज (कटुसत्य व्रुत्त ) :- आशिया खंडातील अत्यंत शक्तीशाली असणाऱ्या अकलूज ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पायल मोरे तर उपसरपंचपदी शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांची बीनविरोध निवड करण्यात आली. अकलूज ग्रामपंचायतीच्या सभागृहात सदरची निवडणुक प्रक्रिया पार पडली. सरपंच व उपसरपंच पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्यामुळे सरपंचपदी पायल मोरे तर उपसरपंचपदी शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांची बिनविरोध निवडी निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रकांत भोसले यांनी जाहीर केली. यावेळी नूतन ग्रामपंचायत सदस्य संजय साठे, रेश्मा गायकवाड, ज्योती फुले, क्रांतीसिंह माने-पाटील, वैष्णवी दोरकर, गिरीराज माने;-पाटील, ज्योती कुंभार, किशोर राऊत, रेश्मा तांबोळी, गणेश वसेकर, उर्वशीराजे मोहिते-पाटील, नाशिक सोनवणे, धनंजय देशमुख, निता शिवरकर तसेच सचिव सुधाकर मुंगुसकर उपस्थित होते.
यावेळी अकलूज ग्रामपंचायतीच्या निवडणूकित सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील व विजयसिंह मोहिते-पाटील विकास नल आणि लोकनेते प्रतापसिंह मोहिते-पाटील परिवर्तन पॅनल हे दोन मोहिते-पाटील नल आमनेसामने होते. यामध्ये विजयसिंह मोहिते-पाटील समर्थकांनी चौदा जागा जिंकून वर्चस्व मिळविले होते.तर लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील परिवर्तन आघाडीच्या उर्वशीराजे मोहिते पाटील या बिनविरोध निवडून आल्या, त्यांनी पहिल्यांदाच अकलूज ग्रामपंचायतीच्या राजकारणात प्रवेश केला असून या नलचे आणखी दोन उमेदवार निवडून आले होते.
या निवडीबाबत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, भाजपचे संघटन सरचिटनीस धैर्यशील मोहिते-पाटील यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
0 Comments