Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रभाग 14 मधून शिवसेनेकडून उमेदवारी मिळाल्यास निवडणूक लढवणार पक्षश्रेष्ठींना भेटून उमेदवारी मागणार युवा शिवसैनिक दिलीप पवार यांची माहिती

 प्रभाग 14 मधून शिवसेनेकडून उमेदवारी मिळाल्यास निवडणूक लढवणार पक्षश्रेष्ठींना भेटून उमेदवारी मागणार युवा शिवसैनिक दिलीप पवार यांची माहिती

मोहोळ (कटुसत्य व्रुत्त ) :- प्रभाग क्रमांक 14 हा गेल्या अनेक वर्षापासूनचा शिवसेनेचा बालेकिल्ला गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेला आहे.आम्ही प्रभागातील सर्व शिवसैनिकांनी अहोरात्र मेहनत घेऊनही केवळ पाच मतांनी हा प्रभाग राष्ट्रवादीच्या ताब्यात गेला याची खंत आजही आम्हाला लागून राहिली आहे. आमच्या प्रभागातून स्थानिक उमेदवारासच  शिवसेना पक्षाकडून उमेदवारी मिळावी यासाठी आम्ही शिवसैनिक सुरुवातीपासून आग्रही आहोत. गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेत मी सक्रिय शिवसैनिक म्हणून कार्यरत आहे. आमच्या प्रभागाचे आरक्षण खुले झाल्यामुळे या प्रभागातून शिवसेनेकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती प्रभाग क्रमांक 14 मधील शिवसेनेचे युवा नेते दिलीप लक्ष्‍मण पवार यांनी दिली.

राष्ट्रवादी पक्षाचा उमेदवार निवडून येऊनही सत्ताधारी पक्षाने प्रभागाकडे काहीही लक्ष दिले नाही. शहरातील अनेक प्रभागात मोठमोठ्या निधीतून विकास कामे सुरू असताना आमचा प्रभाग 14 हा आज ही विकासविना बकालच राहीला आहे. शहराच्या आजूबाजूच्या प्रभागातील नगरसेवक असूनही त्यांनी केवळ आपापल्या प्रभागातच विकासकामे केली. आमच्या प्रभागाला सापत्नभावाची वागणूक सगळ्याच पक्षाकडून मिळाली आहे. आता दिग्गज पक्षाकडून जे जे दिग्गज उमेदवार इच्छुक आहेत ते यापूर्वी कधीही प्रभागात फिरकले देखील नाहीत. आरक्षण सोडतीनंतर मात्र सर्वांना आमचा प्रभाग हवाहवासा आणि स्थानिक असल्याचा दावा करत सोयीचा वाटू लागला आहे. आरक्षण सोडतीनंतर प्रभागात येऊन राजकारण करणाऱ्या सर्वांना येथील सुजाण नागरिकांनी पुरते ओळखले आहे. त्यामुळे येथील जनता स्थानिक उमेदवाराच्या पाठीमागे खंबीर उभी राहणार असल्याने मी शिवसेना पक्षाकडून रीतसर उमेदवारीची मागणी करणार आहे असेही यावेळी दिलीप पवार म्हणाले. नुकत्याच पार पडलेल्या शिवसेनेच्या बैठकीत प्रभागातील शिवसैनिकांना विश्वासात घेतल्याशिवाय आणि वरिष्ठ पक्षश्रेष्ठींना मार्गदर्शन घेतल्याशिवाय मोहोळ शहरातील प्रभाग निहाय उमेदवाऱ्या जाहीर करणार नसल्याची ग्वाही आम्हा सर्वांना जिल्हाप्रमुख गणेश दादा वानकर यांनी दिली आहे. पक्षसंघटनेवर आमचा विश्वास आहे त्यामुळे पक्षाचे नेते नक्कीच प्रभागातील स्थानिक उमेदवारीचा विचार करतील अशी आम्हाला आशा वाटते. उमेदवारी नाही दिल्यास बंडखोरी करणाऱ्या शिवसैनिकापैकी आम्ही अजिबात नाही. मात्र रीतसर पक्षाकडे आमच्या प्रभागातून उमेदवारी मी मागणार असून पक्षश्रेष्ठींनी संधी दिल्यास या प्रभागातून निवडणूक लढवून निश्चितपणे ती जिंकण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे असेही यावेळी दिलीप पवार म्हणाले.
चौकट
आरक्षण खुले झाल्याने उमेदवारी पक्षाला मागण्याचा आम्हाला हक्क आहे आम्हाला उमेदवारी द्यायची की नाही याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील मात्र आमचे मत न घेता प्रभागातील उमेदवारी जाहीर करणे आमच्यावर अन्यायकारक ठरणार आहे अशीही खंत यावेळी पवार यांनी व्यक्त केली.
एका सामान्य कुटुंबात जन्मलेला मी युवक असून मी एक लघुउद्योजकही आहे. स्वावलंबी धोरणाचा असल्याने कोणाच्याही मदतीची अपेक्षा न करता स्वतःच्या पायावर उभा आहे. शिवाय पक्षाच्या पाठबळाचा गैरवापर करत कधी चुकीच्या मार्गाने आम्ही गेलो नाही. भगव्या झेंड्याशी इमान राखत सदैव शिवसेना पक्षाचे प्रामाणिकपणे काम करत आलो आहे. त्यामुळे स्वच्छ आणि सुशिक्षित प्रतिमा हेच माझे तत्व असून यापुढील काळात याच तत्वाने या प्रभागात शिवसेनेच्या माध्यमातून मी कार्यरत राहणार आहे.
दिलीप पवार
युवा शिवसैनिक प्रभाग क्रमांक 14

Attachments area
Reactions

Post a Comment

0 Comments