Hot Posts

6/recent/ticker-posts

सेंद्रिय आणि जैविक शेतीचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या शिंदे दांपत्यांचे कार्य प्रशंसनीय

 सेंद्रिय आणि जैविक शेतीचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या शिंदे दांपत्यांचे कार्य प्रशंसनीय

मृदुला लॅबरोटरी आणि रिसर्च सेंटर च्या मदतीने शेतकऱ्यांना देत आहेत उत्पादन वाढीचे धडे

          सांगोला (प्रतिनिधी)  सांगोला तालुका हा डाळिंब फळासाठी संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. सांगोला तालुक्यातील शेतकरी आपल्या कष्टाने डाळिंब  पिकांतून श्रीमंतीचा मळा फुलवित आहेेेत.आज सांगोला तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना सेंद्रिय आणि  जैविक शेती चा मार्ग दाखवून योग्य आणि अनमोल मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्तींमध्ये प्रा अशोक शिंदे आणि त्यांच्या पत्नी सौ अपर्णा अशो  शिंदे यांचे नाव आघाडीवर आहे.
          मध्यवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या प्रा अशोक शिंदे यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण सांगोला तालुक्यातील ग्रामीण भागात झाल्याने इथल्या शेतकऱ्यांच्या व्यथा  त्यांनी जाणून घेतल्या आणि पहिल्यापासून याच भागातीलअन्नदात्यासाठी काहीतरी वेगळे करण्याचा मनी निर्णय घेतला. याच निर्णयातून त्यांनी आपले शैक्षणिक करीयर शेतीशी निगडित करण्याचा पक्का निर्णय मनाशी ठरविला. आणि त्यांनी आपले दैवत मानणाऱ्या माजी आमदार डॉ गणपतराव देशमुख आणि  वडील शेकापचे सध्याचे सरचिटणीस विठ्ठलराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली  बीएस्सी,नंतर एम्मसी, आणि डबल पीएचडी मिळवत आपले ध्येय साध्य केले.
          विद्यार्थ्यांच्या मनी संशोधनाचे आणि ज्ञानाचे धडे देत त्यांनी न्यू इंग्लिश स्कुल ज्यू कॉलेज सांगोला येथे प्राध्यापकाची नौकरी मिळवून विद्यार्थ्यांना स्वावलंबनाचे धडे देवू लागले.आपल्यातील असणाऱ्या जिज्ञासा वृत्तीने त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना ही चिकित्सक बनविले.विद्यार्थी केंद्रबिंदू मानून प्रा अशोक शिंदे आणि त्यांना तेवढ्याच ताकदीने साथ देणाऱ्या त्यांच्या धर्मपत्नी         शिंदे यांनी ही त्यांच्या कार्याला प्रोत्साहन दिले. आणि त्यांच्या हातून    इयत्ता 11वी आणि 12 वी साठी चार पुस्तकांचे लेखन झाले आहे. 
       त्यांच्या कामाची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाने पुणे येथे पुस्तक लिखाण समितीवर 2016 त्यांची  निवड केली.आंतरराष्ट्रीय केंद्रीय परिषद नवी दिल्ली या सेंद्रिय परिषदेसाठी महाराष्ट्र शासनाकडून त्यांची निवड झाली होती. युरोप मध्ये कृषी अभ्यास दौऱ्यासाठी ही त्यांची निवड झाली होती,त्यांनी मृदुला बायोटेक अँड रिसर्च सेंटरची 2004 ला सांगोला येथे स्थापना केली. माणखोरे येथील संस्कृती व भौतिक रचनेचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी माण नदीचा अभ्यास दौरा 2010 ला काढला होता. महात्मा फुले कृषी विद्यापीठातील या "सोईल हेल्थ अवरनेस"विषयावरील राज्यस्तरीय चर्चासत्रात त्यांनी सहभाग घेतला होता. सेंद्रिय डाळिंब समन्वयक प्रशिक्षण वर्ग पंढरपूर येथे  त्यांनी माार्गदर्शन केले होते.
       महाराष्ट्र शासनाचा महापीक अभियान कृषी दिंडीत त्यांनी सक्रिय सहभाग व शेतकऱ्यांना अनमोल मार्गदर्शनही  केले होते. महाराष्ट्र शासन कृषी विभागातील कृषी चिकित्सालय जत येथे डाळिंब तेलकट डाग व्यवस्थापन प्रशिक्षणात तज्ञ प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन त्यांनी केले होते. सेंद्रिय व जैविक शेती व्यवस्थापनासाठी मार्गदर्शन शिबिरात त्यांनी अनमोल मार्गदर्शन केले आहे. एकंदरीत प्राध्यापक अशोक शिंदे यांनी सांगोला तालुक्यात नाही तर राज्यातील शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या पिकांसाठी आवश्यक असणाऱ्या सेंद्रिय आणि जैविक खतांची निर्मिती करत  मृदुला लॅबरोटरी अँड रिसर्च सेंटरच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना फायदा मिळवून दिला आहे.  शेतीमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न मिळवून देण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन केले आहे.राज्यातील कानाकोपऱ्यातील शेतकरी त्यांना फोन द्वारे सल्ला आणि मार्गदर्शन  घेत आहेत.आणि ते मार्गदर्शक विनामोबदला  देत आहेत.
        सध्याच्या काळामध्ये रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय आणि जैविक खताचा वापर करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता कशी प्राप्त होईल, यासाठी त्यांचा प्रयत्न आहे,आणि हाच प्रयत्न ते संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांना देऊ पाहत आहे. आज जवळपास अशोक शिंदे यांनी स्थापन केलेल्या मृदुला लॅबरोटरी अँड रिसर्च सेंटरच्या माध्यमातून जवळपास 42 व्यक्तींना  रोजगार प्राप्त झाला असून 42 जणांचे संसार उभा करण्याची सामाजिक बांधिलकी ही शिंदे दाम्पत्यांनी जोपासली आहे.एकंदरीतच सामाजिक, आर्थिक सहकार, राजकीय अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांशी संबंध ठेवत आपला संशोधनाचा मूळ पिंड जोपासत शेतीतील विविध पिकांच्या आणि उत्पादनाच्या सेंद्रिय आणि जैविक खतातून शेतकर्याची उन्नती करण्याचा ध्यास मनी घेतलेल्या शिंदे दाम्पत्याचे कार्य वाखाणण्याजोगे आहे.मृदुला लॅबरोटरी आणि रिसर्च या संस्थेचे काम नक्कीच शेतकऱ्यांना वरदान ठरलेले आहे. रासायनिक खतांच्या अतिवापराने होणारे दुष्परिणाम हे  प्रा अशोक शिंदे हे विविध ठिकाणी व्याख्यानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना  पटवून देत आहेत. मृदुला लॅबरोटरी अँड रिसर्च सेंटरच्या माध्यमातून माती,पाणी यांचे परीक्षण करण्यासाठी त्यांनी फिरती मोबाईल व्हॅन तयार केली असून शेतकऱ्यांना त्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरत आहे.त्यातून ते अनेक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत.त्यांच्या कार्याची दखल घेऊन " दैनिक सकाळ'च्या वतीने  त्यांना सकाळ एक्सलन्स अवार्ड 2019  मिळाला आहे.
        अनेक सामाजिक संघटनांनी त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक पुरस्कार  दिले आहेत. रोटरी क्लब आयोजित स्वच्छता अभियानात त्यांचा सहभाग असतो, माती-पाणी पान व देठ परीक्षणासाठी मृदुला लबरोटरीची उभारणी केली असून जागृतीसाठी खेडोपाडी मार्गदर्शन सुद्धा त्यांनी केलेले आहे .डाळिंबावरील तेलकट डाग निर्मूलनावर ई टीव्हीवर त्यांची मुलाखत  प्रसिद्ध झाली आहे. एकंदरीतच बावीस वर्ष शैक्षणिक क्षेत्रातील अध्यापनात उत्तुंग कार्य करणाऱ्या आणि शेतकऱ्यांच्या मनी सेंद्रिय आणि जैविक खतांचा ध्यास मनी उतरवून त्यांना आर्थिक सुबत्ता प्राप्त करून देणाऱ्या संस्थेचे काम उत्कृष्ट आहे.त्यांच्या या कार्याची दखल घेऊन अनेक सामाजिक संघटना ही त्यांना विविध ठिकाणी मार्गदर्शनासाठी बोलवत आहेत. अशा पद्धतीने  प्रा शिंदे यांनी केलेले कार्य उत्कृष्ट आहे.त्यांच्या या कार्यासाठी मनापासून शुभेच्छा !!
           श्री जगन्नाथ साठे (विभागीय सह संपादक,दै कटुसत्य सोलापूर,वृत्तदर्पण न्यूज चॅनेल सोलापूर) 
Reactions

Post a Comment

0 Comments