जेऊर येथे संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेडकडून शिवजयंती साजरी

करमाळा (कटूसत्य वृत्त): संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेड च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची 391 वी जयंती जेऊर ता. करमाळा येथे मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली .
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज तसेच अहिल्यामाता होळकर, महात्मा ज्योतिराव फुले, संत गाडगेबाबा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे या महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन आजी माजी सैनिक व व सर्व महिला यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी शिवकन्या सिद्धी वळेकर, शिवकन्या सिद्धी पाटील ,व शिवमती हर्षदा देशमाने यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची माहिती दिली .वीर माता सोनाबाई काटे यांच्या हस्ते माजी सैनिक भागवत पवार ,विलास कोठावळे, सतीश राऊत, भास्कर आरकिले ,अंकुश गायकवाड, रवींद्र सव्वाशे सुभाष मटके ,सोमनाथ शिरस्कर, अनंत पवार , नितीन पवार, साळुंखे सर व वीर पत्नी राणी काटे, महाराष्ट्र केसरी चंद्रहास निमगिरे, युवा नेते माणिक दादा पाटील यांचे राष्ट्रमाता जिजाऊंची प्रतिमा व मराठा सेवा संघाची दिनदर्शिका देऊन सन्मान करण्यात आला . यावेळी ,बळीराम जाधव, दादा गावडे, देवानंद पाटील, बाळासाहेब कर्चे, निलेश कदम ,पत्रकार आशपाक सय्यद आलिम शेख , रामभाऊ घोडपडे, दिलिप जगताप , विष्णू माने, गुंडगिरे महाराज, ग्रामसेवक कुदळे भाऊसाहेब, नागेश झांझुर्णे, संतोष वाघमोडे, दत्तु पिसे ,राजाभाऊ जगताप, विनोद गरड , धनंजय वळेकर , बाळासाहेब येवले, संजय भोसले तात्या मोहिते, जालिंदर कांडेकर , दादा गरड ,आबा झाडे इ उपस्थित होते.
यावेळी बोलताना संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष नितीन खटके म्हणाले की,छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या काही लढाया केल्या त्यात त्यांनी शत्रूला पराभूत केले.त्या ढाल तलवारी ची लढाई आज नसली तरी कोरोनाशी आपले युद्ध सुरू आहे .यामुळे कोरोना चा प्रादुर्भाव पाहता मोजक्या लोकात आम्ही शिवजयंती साजरी केली आहे. तसेच महाराष्ट्र शासनाने मिरवणुकीला परवानगी न दिल्याने मिरवणुकीचा खर्च टाळून गोरगरीब अनाथ ,मतिमंद मुलांना मदत व काही गरजू लोकांना संसारोपयोगी वस्तू देऊन मदत केली जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. काही मुले शिक्षणासाठी दत्तक घेण्याचे नियोजनही समिती कडून करण्यात येत असल्याचे त्यानी यावेळी सांगितले.या कार्यक्रमाला जिजाऊ ब्रिगेडच्या सदस्या,मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड चे कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments