Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर जिल्ह्यासाठी फळे भाजीपाला प्रक्रिया व कांदा या उत्पादनाची 'एक जिल्हा-एक उत्पादन' म्हणून निवड करावी - माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी कांबळे

 सोलापूर जिल्ह्यासाठी फळे भाजीपाला प्रक्रिया व कांदा या उत्पादनाची 'एक जिल्हा-एक उत्पादन' म्हणून निवड करावी - माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी कांबळे

शिवाजी कांबळे माजी जिल्हा परिषद सदस्य

          मोडनिंब  (प्रकाश सुरवसे): 'एक जिल्हा-एक कृषी उत्पादन' योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यासाठी फळे भाजीपाला प्रक्रिया व कांदा या उत्पादनांची निवड करण्यात यावी अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी कांबळे यांनी केंद्रीय कृषिमंत्री राधा मोहन सिंह यांच्याकडे केली आहे.

          सोलापूर जिल्ह्यासाठी ज्वारी या पिकाची 'एक जिल्हा- एक उत्पादन'म्हणून निवड केली असल्याचे नुकतेच शासनाने जाहीर केले आहे. यासंदर्भात तसे पत्रही शासनाकडून माजी जिल्हा परिषद सदस्य श्री.कांबळे यांना पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.

          केंद्रसरकारच्या प्राईम मिनिस्टर फार्मलायजेशन ऑफ मायक्रो फुड प्रोसेसिंग (पी एम एफ एम ई) या योजनेअंतर्गत नाशवंत कृषी मालावर प्रक्रिया करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी केंद्र आणि राज्य सरकार यांच्या वतीने सदर  योजना राबविण्यात येत आहे.

          या योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळ्या पिकांची निवड करण्यात आलेली आहे.यामध्ये महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यासाठी 'ज्वारी'या पिकाची निवड करण्यात आलेली आहे. पूर्वीच्या काळी पावसावर अवलंबून असलेल्या शेती व्यवस्थेत ज्वारी पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. परंतु निव्वळ ज्वारीच्या पिकाच्या उत्पादन आणि शेतकऱ्यांना सध्याच्या काळात आर्थिक सुबत्ता येऊ शकणार नाही.

          सध्या सोलापूर जिल्ह्यात उजनी धरण आहे. तसेच भीमा व सीना या दोन नद्या आहेत. यावर आधारित असलेल्या सिंचनामुळे जिल्ह्यात द्राक्ष, डाळिंब यासह अनेक फळबागा,अन्नधान्य व कडधान्य, कांदा, टोमॅटो यासह नाशवंत कृषी मालाची मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जात आहे.

          फळबागामुळे सध्याच्या काळात शेतकरी विकसित होण्याच्या मार्गावर आहे.परंतु केंद्र सरकारच्या प्राईम मिनिस्टर फार्मलारयजेशन ऑफ मायक्रो फुड प्रोसेसिंग (पी एम एफ एम ई) या योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातून फक्त 'ज्वारी' या अन्नधान्य पिकांची निवड करण्यात आलेली आहे. त्यामुळे फळ बागायतदार शेतकरी आणखी मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडणार आहेत.

          सोलापूर जिल्ह्यात  ज्वारी सोबत फळे, भाजीपाला प्रक्रिया व  व नाशवंत कृषिमाल यांचा सहभाग करून तरुण शेतकऱ्यांना नवसंजीवनी द्यावी. अशी मागणी निवेदनात द्वारे सरकारला करण्यात आली आहे.

          सदर योजनेअंतर्गत उत्पादन निवडण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे सदर समितीने पारंपारिक ज्वारी या उत्पादनाचा विचार न करता सध्याची सोलापूर जिल्ह्याची उजनी धरणा मुळे होणारी पाण्याची व्यवस्था व सध्या असलेल्या फळबागांचा विचार करून निर्णय घ्यायला हवा होता सदर समितीने चुकीचा निर्णय घेतल्याने जिल्ह्यावर मोठ्या प्रमाणात काढणे होणार आहे याचा फेरविचार करावा. शिवाजी कांबळे माजी जिल्हा परिषद सदस्य. 

Reactions

Post a Comment

0 Comments