Hot Posts

6/recent/ticker-posts

वीज पुरवठा खंडित करण्याचा जुलमी निर्णय महाविकास आघाडी सरकारने त्वरित मागे घ्यावा - धैर्यशील मोहिते-पाटील

वीज पुरवठा खंडित करण्याचा जुलमी निर्णय महाविकास आघाडी सरकारने त्वरित मागे घ्यावा - धैर्यशील मोहिते-पाटील

          अकलूज (कटूसत्य वृत्त): महावितरणाने 75 लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून महाराष्ट्रातील 4 कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे पाप करणा-या महावितरणाच्या निषेधार्थ महावितरण कार्यालय अकलूज येथील महावितरण कार्यालयास टाळे ठोकत हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहीते पाटील,तालुका अध्यक्ष बाजीराव काटकर, बाळासाहेब वावारे, बाळासाहेब सरगर, संजय देशमुख, रणवीर देशमुख, फातीमा पाटावाला, भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

          यावेळी धैर्यशील मोहीते पाटील म्हणाले, राज्यातील 75 लाख वीज ग्राहकांना नोटीस पाठवून वीज पुरवठा खंडीत करण्याचा जुलमी निर्णय महाविकास आघाडी सरकारने त्वरीत मागे घ्यावा. महाविकास आघाडी सरकारने कोरोना काळात नंतर सामान्य जनतेला व शेतक-यांना वीज बिल माफीचे आश्वासन देणारे राज्यसरकार आता सक्तीने वीज बिल वसूली करून जनतेला वेठीस धरत त्रास देत आहे.वीज बिल भरले नाही तर वीज पुरवठा खंडीत करण्याचा निर्णय घेणार महाविकास आघाडीच सरकार जनतेप्रती किती असंवेदनशील आहे हे यावरून दिसून येते.

          कोरोना नंतर सामान्य जनतेला प्रचंड आर्थिक झळ बसली आहेे. कोरोना काळात अवाजवी वीज बिल महावितरण कडून पाठवले गेले, भरण्याची क्षमता सामान्य माणसाकडे नाही. शेतकरी व सामान्य जनता वीज बिल भरण्याच्या अवस्थेत नाही.

          महाविकास आघाडी सरकारच्या ऊर्जामंत्र्यांनीच 100 युनिट पर्यंतचे वीज बिलं माफ करण्याचे आश्वासन दिले होते. हे आश्वासनही आजतागायत प्रत्यक्षात आले नाही. जनतेला खोटी आश्वासने देऊन गंडवण्याचा प्रकार महाविकास आघाडीने केला आहे. शासनाने सक्तीची वीज बिलं वसूलीच्या नावाखाली जनतेची व शेतक-यांची आर्थिक पिळवणूक थांबवावी असे मोहीते पाटील म्हणाले. 

Reactions

Post a Comment

0 Comments