Hot Posts

6/recent/ticker-posts

आयएएस अधिकाऱ्यांच्या नावाने फेक फेसबूक अकाउंट बनवून होते पैशाची मागणी नागरिकांनीही सावध राहण्याचे जिल्हाधिकारी रमेश घोलप यांचे आवाहन

आयएएस अधिकाऱ्यांच्या नावाने फेक फेसबूक अकाउंट बनवून होते पैशाची मागणी नागरिकांनीही सावध राहण्याचे जिल्हाधिकारी रमेश घोलप यांचे आवाहन

          मोडनिंब, (प्रकाश सुरवसे) : नागरिकांनी फ्राड कॉल पासून सावध रहावे  असे आवाहन  बँक, एलआयसी तसेच अन्य वित्तीय संस्थांकडून वेळोवेळी होत असते. तरीदेखील नागरिकांनी एटीएम व संबंधित माहिती दिल्याने फसवणूक होत असते. आता तर  आयएएस अधिकारी  यांच्या नावानेच फेक फेसबुक अकाउंट तयार करून  पैसे मागितल्याचे उदाहरण समोर आले आहे. याबाबत नागरिकांनी सावध रहावे  असे आवाहन झारखंडमधील कोडरमा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रमेश घोलप यांनी  केले आहे.

          जिल्हाधिकारी श्री। घोलप यांच्या नावे फेसबुकवर फेक अकाउंट तयार करण्यात आले आहे. या फेसबुक अकाउंट वरून चॅटिंग करून सुरुवातीला कसे आहात बरे आहेत का अशी व इतर माहिती विचारून  घेतली जात आहे. त्यानंतर छोटेसे काम आहे पेटीएम वरून पैसे पाठवता का? गरज आहे अशा प्रकारचे मेसेज अनेकांना आले आहेत आता फेसबुक अकाऊंट धारकांनी ही याबाबत सजग राहण्याची गरज आहे.

          तक्रार करतोय पण हे असले फेसबुक वर फेक अकाऊंट काढून, सेम  प्रोफाईल फोटो आणि कव्हर फोटो ठेऊन मेसेंजर वर.. कहां हो? एक छोटा सा काम है..कुछ पैसे की जरूरत है..अर्जंट है...paytm है क्या? असले मेसेज करणार्‍यांपासून सावध रहा... रमेश घोलप, जिल्हाधिकारी कोडरमा. (झारखंड)

          जिल्हाधिकारी रमेश घोलप यांचे फेक फेसबुक अकाउंट वरून मला सुरूवातीला इतर माहिती विचारत नंतर पैशाची रिक्वेस्ट करण्यात आली. माझ्या लक्षात आल्याने मी त्या खोट्या पोस्टला महत्त्व दिले नाही. अशाप्रकारच्या फेक फेसबुक अकाउंट ला कोणीही बळी पडू नये डॉक्टर आशिष शेंडगे अरण ता. माढा जिल्हा सोलापूर.

          जिल्हाधिकारी रमेश घोलप यांचे फेसबुक अकाउंट तयार केले असून या अकाउंट वरून चॅटिंग करत मला ही रिक्वेस्ट आली आहे.प्रा. अमोल पाटील, अरण.

Reactions

Post a Comment

0 Comments