Hot Posts

6/recent/ticker-posts

पदवीधरचे लोकप्रिय आम. अरुण अण्णा लाड यांच्या झंजावाती आभार दौऱ्यास सांगोल्यातून सुरुवात : मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पदवीधरचे लोकप्रिय आम. अरुण अण्णा लाड यांच्या झंजावाती आभार दौऱ्यास सांगोल्यातून सुरुवात : मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

महाविकास आघाडीच्या एकीमुळेच पुणे पदवीधरमधून विक्रमी मतांनी विजय : आम. अरुण अण्णा लाड

          सांगोला (कटूसत्य वृत्त): गेल्या अनेक वर्षांपासून पुणे पदवीधर मतदार संघातील सुशिक्षित बेरोजगार पदवीधरांना भूलथापा देऊन निवडणूक जिंकणाऱ्या भारतीय जनता पार्टीला यंदा सुशिक्षित पदवीधर मतदारांनीच त्यांची जागा दाखवून दिली आहे. महाविकास आघाडीच्या एकीमुळेच पुणे पदवीधर मतदार संघातून केवळ पहिल्या पसंतीच्या विक्रमी मतांनी माझा विजय झाला. पदवीधर मतदारांनी ज्या विश्वासाने आणि अपेक्षेने मला निवडून दिले त्या विश्वासास सदैव पात्र राहीन, असे प्रतिपादन पुणे पदवीधरचे नूतन लोकप्रिय आमदार अरुण अण्णा लाड यांनी केले.

          पुणे पदवीधर मतदार संघातून विक्रमी मतांनी विजय झाल्यानंतर प्रथमच आमदार अरुण अण्णा लाड यांनी मतदारांचे आभार मानण्यासाठी आभार दौरा आयोजित केला आहे. याची सुरुवात शनिवार दि.6 फेब. पासून सांगोला येथून करण्यात आली. राष्ट्रवादी भवन सांगोला येथे भेट देऊन त्यांनी परिसरातील मतदारांचे व महाविकास आघाडीतील नेतेमंडळींचे विशेषतः महाविकास आघाडीचे जिल्ह्याचे समन्वयक म्हणून यशस्वीरित्या जबाबदारी पार पाडणारे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांचे आभार मानले. यावेळी ज्येष्ठ नेते बाबुराव गायकवाड, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे पश्चिम महाराष्ट्राचे सरचिटणीस लतीफभाई तांबोळी, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयमलाताई गायकवाड, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत शिंदे, शहराध्यक्ष तानाजीकाका पाटील, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा शुभांगीताई पाटील, महादेव गायकवाड, पियुष साळुंखे-पाटील, सोलापूर जिल्हा परिषदेचे कृषी सभापती अनिल मोटे, योगेश खटकाळे, विजय पवार, विनायक मिसाळ, दीपक शिंदे, काँग्रेसचे शहराध्यक्ष तोहिद मुल्ला, नगरसेवक सोमनाथ लोखंडे, जुबेर मुजावर, अनिल खडतरे, आनंद घोंगडे, संपतराव पाटील, मनोज उकळे, विनोद रणदिवे, शिवाजी कोळेकर, अमोल सावंत, अकिब पटेल, तुषार इंगळे, महेश गुरव, सचिन पाटणे, भारत साळुंखे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस व महाविकास आघाडीतील पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

          पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक झाल्यानंतर या मतदारसंघातून विक्रमी मतांनी विजयी झालेले लोकप्रिय आमदार अरुण लाड प्रथमच सोलापूर जिल्ह्यात मतदारांचे आभार मानण्यासाठी दाखल झाले होते. सांगोला येथून त्यांच्या आभार दौऱ्याची सुरुवात करण्यात आली. यावेळी सकाळी 9 ची वेळ असूनही महाविकास आघाडीतील मतदार आणि पदाधिकाऱ्यांत प्रचंड उत्साह दिसून येत होता. पुढे बोलताना अरुण अण्णा लाड यांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दिलेल्या सर्व आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी आपण कटिबद्ध राहू, असा विश्वास व्यक्त केला. यासाठी सोलापूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या सर्वच नेतेमंडळी पदाधिकारी व मतदारांना नेहमीच विश्वासात घेऊन पदवीधरांच्या न्याय हक्कासाठी राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून सदैव प्रयत्नशील राहू असे अभिवचनही शेवटी आमदार अरुण अण्णा लाड यांनी दिले.

          यावेळी डॉ. पियुष साळुंखे पाटील शहराध्यक्ष तानाजीकाका पाटील आदींनी आपले मनोगत व्यक्त करून परिसरातील पदवीधरांच्या समस्या व अन्य प्रश्नांकडे नूतन आमदार अरुण अण्णा लाड यांचे लक्ष वेधले.

मा.आम.दिपकआबांचे सोलापूर जिल्ह्यात उत्कृष्ट नियोजन 
          देशाचे नेते  आदरणीय शरदचंद्रजी पवार  राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार  राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष नाम. जयंत पाटील साहेब व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय (मामा) भरणे यांनी सोलापूर जिल्ह्याची संपूर्ण जबाबदारी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्यावर सोपविली होती. दिपकआबांंनी पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे सोलापूर जिल्ह्याचे समन्वयक म्हणून सोलापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या नेतेमंडळी व पदाधिकाऱ्यांची एकत्रित मोट बांधून अत्यंत उत्कृष्ट नियोजन केले. त्यांनी सर्वांना सोबत घेऊन पदवीधर मतदारांना केलेल्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद देऊन सोलापूर जिल्ह्यातील पदवीधर मतदारांनी महाविकास आघाडीवर विश्वास दर्शविला. - आम.अरुण अण्णा लाड

Reactions

Post a Comment

0 Comments