अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना
पहिली, दुसरीसाठी प्रवेश घेण्याचे आवाहन
सोलापूर ( कटूसत्य वृत्त ) :- आदिवासी विकास विभागामार्फत 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इयत्ता पहिली आणि दुसरीसाठी निवासी नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मोफत प्रवेश देण्यात येत आहेत. याचा लाभ घेण्याचे आवाहन एकात्मिक आदिवासी विकासच्या प्रकल्प अधिकारी शुभांगी कांबळे यांनी केले आहे.
इयत्ता पहिली आणि दुसरीच्या वर्गात प्रवेश घेण्यास पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांनी नजिकच्या प्रत्येक शासकीय आश्रमशाळेतील मुख्याध्यापकांमार्फत विशिष्ट कालावधीत नावनोंदणी करावी. आदिम जमाती, अपंग/विधवा/घटस्फोटित/निराधार/
अधिक माहितीसाठी प्रभारी सहायक प्रकल्प अधिकारी विशाल सरतापे (8668774254) यांच्याकडे संपर्क साधावा. 19 फेब्रुवारी 2021 पासून अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ झाला असून आवश्यक कागदपत्रासह त्वरित अर्ज सादर करण्याचे आवाहन श्रीमती कांबळे यांनी केले आहे.
प्रवेशासाठी अटी
विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा. विद्यार्थी दारिद्र्यरेषेखालील असेल तर यादीमधील अनुक्रमांक नमूद करावा. पहिलीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्याचे वय पाच वर्षे पूर्ण असावे. दुसरीसाठी पहिलीचा शाळा सोडल्याचा दाखला असावा. जन्मतारखेसाठी ग्रामसेवक अथवा अंगणवाडीचा दाखला जोडावा. पालकांनी संमतीपत्र आणि शाळेत प्रवेशासाठी अर्ज करावा. अर्जासोबत दोन पासपोर्ट फोटो, जातीचा दाखला, रहिवाशी दाखला, उत्पन्नाचा दाखला (एक लाख रूपयांपर्यंत मर्यादा), रेशनकार्ड जोडावे. विद्यार्थ्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र जोडावे. विद्यार्थ्यांचे पालक शासकीय/निमशासकीय नोकरदार नसावेत. खोटी माहिती सादर केल्यास प्रवेश रद्द केला जाईल. एकदा शाळा निश्चित झाल्यावर शाळा बदलता येणार नाही.
0 Comments