वीज कनेक्शन तोड मोहीम तात्काळ थांबवावी - गणेश चिवटे
सद्यस्थितीत शेतकऱ्यांचा माल अजून शेतीमध्येच आहे तसेच ऊस बिल मिळालेले नाही त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक तारांबळ उडाली आहे आणि या स्थितीत वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वीज कनेक्शन तोड मोहीम हाती घेतली आहे या संदर्भात आम्ही पाठीमागच्या वेळेस आंदोलन करून वीज वितरण अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते त्यावेळेस वीजवितरण अधिकाऱ्यांनी असे तोंडी सांगितले होते की आम्ही वीज कनेक्शन तोडणार नाही परंतु आता त्यांनी जी मोहीम हाती घेतली आहे ती संपूर्णपणे चुकीची आहे.त्यामुळे सदर वीज वितरण अधिकाऱ्यांना तहसीलदार यांनी आदेश देऊन 31 मार्च पर्यंत वीज कनेक्शन तोड मोहीम थांबवावी तोपर्यन्त शेतकरी हळू हळू टप्प्या टप्प्याने त्यांचे चालू बिल भरतील आणि वीज वितरण कार्यालयास सहकार्य करतील असे निवेदनात म्हटले आहे
यावेळी भाजपचे विस्तारक भगवानगिरी गोसावी, तालुका उपाध्यक्ष काकासाहेब सरडे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सचिन गायकवाड, कोळगावचे सरपंच तात्यासाहेब शिंदे, घोटीचे सरपंच सचिन राऊत, शेलगाव ग्रा. प. सदस्य दत्तात्रय पोटे, खडकीचे युवा नेते मोहन शिंदे,अजिनाथ सुरवसे, संदीप काळे, संजय कुलकर्णी, जयंत काळेपाटील आदी उपस्थित होते.
0 Comments