Hot Posts

6/recent/ticker-posts

मुरघास निर्मिती युनिटसाठी संस्थांनी अर्ज करण्याचे आवाहन

 मुरघास निर्मिती युनिटसाठी संस्थांनी अर्ज करण्याचे आवाहन


                               


 सोलापूर  ( कटूसत्य वृत्त ) :- राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत मुरघास निर्मिती युनिटसाठी सायलेज बेलर

 मशिन स्थापन करण्यासाठी जिल्ह्यातील सहकारी दूध उत्पादक संघ/संस्थाशेतकरी उत्पादक

 कंपनीस्वयंसहायता बचत गट आणि गोशाळा/पांजरापोळ संस्थांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

 परिपूर्ण प्रस्ताव 5 मार्च 2021 पर्यंत सादर करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एन.ए. 

सोनवणे यांनी केले  आहे. प्रती मुरघास निर्मिती युनिटसाठी 10 लाख रूपये (यामध्ये 50 टक्के हिस्सा केंद्र

शासनाचा) निधी असून उर्वरित 50 टक्के 10 लाख रूपये संस्थेने खर्च करायचा आहे.

 जिल्ह्यातील सर्वसाधारण प्रवर्गातील एकाच संस्थेला योजनेचा लाभ देण्यात येणार असून प्रस्तावाचा

 नमुना पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाकडे मिळतील. इच्छुकांनी परिपूर्ण प्रस्ताव पशुधन

 विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समितीकडे सादर करावा.

अधिक माहितीसाठी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयनेहरूनगरसोलापूरदूरध्वनी

 क्र. 0217-2342696 अथवा ‌ddcahsolapur@gmail.com यावर संपर्क साधण्याचे आवाहन डॉ. सोनवणे

यांनी केले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments