Hot Posts

6/recent/ticker-posts

हरियाणा येथील सतपालसिंह यांची ताराराणी महीला कुस्ती केंद्राच्या मुख्यप्रशिक्षक पदी निवड

 हरियाणा येथील सतपालसिंह यांची ताराराणी महीला कुस्ती केंद्राच्या मुख्यप्रशिक्षक पदी निवड


अकलूज (कटुसत्य वृत्त ) :-
राष्ट्रीय पदक विजेते आणि द्रोणाचार्य महावीर फोगट कुस्ती केंद्राचे मुख्य प्रशिक्षक राहीलेले सतपालसिंह यांची शिवरत्न शिक्षण संस्था संचलित ताराराणी महीला कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या मुख्य प्रशिक्षकपदी(कोच) निवड करण्यात आली. ग्रामीण भागातील खेळाडूंना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील चमकदार कामगिरी करण्यासाठी देखील राष्ट्रीय दर्जाचे गुणवत्तापूर्ण व उच्च दर्जाचे प्रशिक्षणाची गरज असते या मूलभूत अनुषंगाचा विचार करून हरियाणा राज्यातील काॅमनवेलथ विजेती गीता फोगट यांच्या द्रोणाचार्य महावीर फोगट कुस्ती केंद्राचे मुख्य प्रशिक्षक राहीलेले सतपालसिंह यांना ताराराणी महीला कुस्ती केंद्रास प्रशिक्षण देण्यास पाचारण करण्यात आले आहे असे ताराराणी महीला कुस्ती केंद्राच्या अध्यक्षा जि.प.सदस्या शितलदेवी मोहीते पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. शिवरत्न शिक्षण संस्थाचे अध्यक्ष व शिवरत्न कुस्ती प्रशिक्षणाचे केंद्राचे प्रमुख धैर्यशील मोहीते पाटील म्हणाले की,राज्यभरात कुस्ती आखाड्यांचे स्वरूप आजही पारंपरिक लाल मातीचेच आहे. काॅमनवेलथ ऑलिंपिक पदक विजेते कुस्तीपटू घडवण्यासाठी मॅटवर खेळणे ही काळाची गरज बनली आहे. परंतु ग्रामीण भागात बऱ्याच ठिकाणी मॅटची व गुणवत्तापूर्ण प्रशिक्षणाची तसेच राष्ट्रीय प्रशिक्षकांची सुविधा उपलब्ध नसल्याचा फटका कुस्तीमध्ये कारकीर्द घडवू इच्छिणाऱ्या खेळाडूंना बसतो म्हणूनच राष्ट्रीय स्तरावर मॅटवरील कुस्ती खेळाडू घडवण्यासाठी त्यासाठी बेसिक सुविधा पुरवण्यात पासून ते राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देत आहोत यांचा जास्तीत जास्त होतकरू खेळाडूंनी लाभ घ्यावा व शिवरत्न व तराराणी कुस्ती केंद्रास संपर्क करावा 9604136946


Attachments area
Reactions

Post a Comment

0 Comments