अकलूज येथील महाशिवरात्र यात्रा रद्द अध्यक्ष जयसिंह मोहिते - पाटील यांची माहिती
महाशिवरात्र यात्रा महोत्सव समिती चॅरिटेबल ट्रस्ट शंकरनगर - अकलूज यांचे विद्यमाने सालाबादप्रमाणे ५ ते ६ दिवसामध्ये “ महाशिवरात्र यात्रा ” मोठ्या प्रमाणात भरविण्यात येते . सदर महाशिवरात्र यात्रेमध्ये यात्रा व प्रदर्शन समारंभ , पिक स्पर्धेमध्ये ठेवलेल्या शेतीमालाचे उत्कृष्ट नमुन्याचे परिक्षकाकडून निरीक्षण व बक्षीसपात्र नमुन्याची निवड , उत्कृष्ट जातीवंत जनावरांची व घोड्यांची निवड , दुधाची स्पर्धा घेणेत येऊन जादा दुध देणा - या गायीची निवड केली जाते तसेच महाशिवरात्री दिवशी शिवपार्वतीस अभिषेक व महापूजा केली जाते . तसेच कर्मवीर कै.बाबासाहेब माने - पाटील , सहकार महर्षि कै.शंकरराव मोहिते - पाटील व धर्मवीर कै.सदाशिवराव माने - पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नामांकीत पुरुष व महिला मल्लांच्या जंगी निकाली कुस्त्यांच्या फडाचे आयोजन करणेत येऊन विजेत्या मल्लांना बक्षिस वितरण करण्यात येते . सदर महाशिवरात्र यात्रा व जंगी निकाली कुस्त्यांकरीता पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने देवदर्शन व यात्रेकरीता उपस्थित राहत असल्याने फार मोठ्या प्रमाणावर गर्दी होते . सध्या देशात व राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने दि .७ / ०३ / २०२१ ते दि .१२ / ०३ / २०२१ या कालावधीमध्ये सालाबादप्रमाणे भरविण्यात येणारी " महाशिवरात्र यात्रा ” न भरविण्याचा निर्णय यात्रा कमिटीने घेतला असल्याची माहिती यात्रा कमिटीचे अध्यक्ष , जयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांनी दिली.
0 Comments