Hot Posts

6/recent/ticker-posts

भक्ती मार्गा आडून शक्तिप्रदर्शन करणारे संजय राठोड यांना तातडीने अटक करावी - रोहन सुरवसे पाटील

 भक्ती मार्गा आडून शक्तिप्रदर्शन करणारे संजय राठोड यांना तातडीने अटक करावी - रोहन सुरवसे पाटील    

अकलूज ( कटुसत्य वृत्त ) :- पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी  आरोपाच्या जाळ्यात सापडलेले राज्याचे वन मंत्री संजय  राठोड यांनी भक्तीच्या मार्गा आडून शक्तिप्रदर्शन घडवून आणले, हे अत्यंत निंदनीय प्रकार असून तातडीने त्यांचेवर कठोर कारवाई करून त्यांना अटक करावी अशी मागणी स्वाभिमानी ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रोहन सुर वसे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे. पुढे बोलताना रोहन सुर वसे पाटील म्हणाले की  वर्ष झाले जनता आणखी कोरोनाच्या  विळख्यातून बाहेर आली नाही. कोरोनाने लाखो लोकांचे जीवन उद्ध्वस्त केले आहे. व आणखी करत आहे.आपली आरोग्य यंत्रणा,पोलीस यंत्रणा, डॉक्टर, यंत्रणा, हे  स्वतःच्या जिवाची बाजी लावून कर्तव्य बजावत  आहेत. कर्तव्य बजावत असताना अनेकांनी आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा उद्रेक पाहता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामाजिक राजकीय धार्मिक कार्यक्रम न करण्याच्या सांगितले होते. असे असताना, कोणत्याही प्रकारचे नियमांचे पालन न करता त्यांच्या पक्षातील, त्यांच्या मंत्रिमंडळातील आरोपाच्या जाळ्यात सापडलेले वन मंत्री संजय राठोड यांनी  जबाबदारीचे भान ठेवले नाही. पोहरादेवी येथे भक्तीच्या अडून शक्तीप्रदर्शन घडवून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणले. अशा बेजबाबदार वागणाऱ्या संजय राठोड यांना तातडीने अटक करावी अन्यथा स्वाभिमानी ब्रिगेड संघटनेच्या  माध्यमातून राज्यभर आंदोलन करणार असल्याची माहिती रोहन सुरवसे पाटील यांनी दिली.

Reactions

Post a Comment

0 Comments