मळणीयंत्रात गुंतून शेतकरी महिलेचा मृत्यूपोथरे येथील घटनेने तालुक्यात हळहळ
करमाळा ( कटूसत्य वृत्त ) :- शेतातील ज्वारीची मळणी करत असताना उषा पंडित झिंजाडे (वय – ४२) मु. पो पोथरे, ता करमाळा, यांचा मळणी यंत्रात डोके अडकून मृत्यू झाला .
या हृदयद्रावक घटनेमुळे तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, सध्या सर्वत्र ज्वारी ,हरभरा ,गहू आदी पिकांची काढणी ,मळणी आदी कामे सुरू आहेत. मयत उषा,पती पंडित, मुलगा अनिकेत हे शेतात शुक्रवार, दि २६ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ च्या सुमारास ज्वारी करण्यासाठी गेले होते. ज्वारी करत असताना उषा यांचे केस मशीनमध्ये गेले.मळणी सुरू असताना मशीनखालील ज्वारीची कणसे गोळा करण्याच्या प्रयत्नात त्या मळणी मशीनमध्ये ओढल्या गेल्या. व क्षणार्धात त्यांचे डोके धडावेगळे झाले.पोलिसात या घटनेची आकस्मिक मृत्य म्हणू नोंद झाली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे
झिंजाडे परिवारावर तसेच पोथरे गावावर शोककळा पसरली. शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
गेल्या काही दिवसात मळणी यंत्रात सापडून अनेक शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाला असून मळणी करताना सावधानता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.
0 Comments