सांगोला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व विविध विभागप्रमुख यांना तत्काळ निलंबित करावे अन्यथा संभाजी ब्रिगेडचे जि.प.समोर आंदोलन - सचिन जगताप,जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड
सांगोला ( कटूसत्य वृत्त ) :- छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जगभर उत्साहात साजरी केली जात असताना सांगोला पंचायत समिती आवारात शिवछत्रपतींचा पुतळा या ठिकाणी कार्यक्रम मा.पं.स.सभापती राणीताई कोळवले यांच्या हस्ते पार पडला.या कार्यक्रमास स्वतः गटविकास अधिकारी संतोष राऊत साहेब व त्यांचे सर्व खाते प्रमुख गैरहजर होते.महापुरुषांच्या जयंती - स्मृतीदिनाबाबत वरिष्ठ अधिकारी ईतके बेजबाबदार वागत असतील तर जनतेच्या प्रश्नावर किती लक्ष देत असतील हा प्रश्न आहे.संबधित अधिकारी यांना तत्काळ निलंबित करावे अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हा परिषद समोर १५ मार्च रोजी धरणे आंदोलन करण्यात येईल असे निवेदन संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप यांनी जि.प.उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत यांच्याकडे दिले
0 Comments