Hot Posts

6/recent/ticker-posts

शंकरराव मोहिते महाविद्यालयात मराठी लेखक : प्रकल्प लेखन स्पर्धेचे आयोजन

 शंकरराव मोहिते महाविद्यालयात
मराठी लेखक : प्रकल्प लेखन स्पर्धेचे आयोजन


अकलूज ( कटूसत्य वृत्त ) :- येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शंकरराव मोहिते महाविद्यालयाच्या मराठी व राज्यशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने दि.27 फेब्रुवारी मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून मराठी लेखक  : प्रकल्प लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.दत्तात्रय बागडे यांनी दिली.
स्पर्धेसंबंधी माहिती सांगताना डॉ.विश्वनाथ आवड म्हणाले, ही लेखन स्पर्धा संस्थेचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते-पाटील यांचे मार्गदर्शनाखाली घेण्‍यात येणार आहे. या लेखन स्पर्धेमध्ये कोणत्याही मराठी लेखकांचा फोटो चिटकवुन त्यांची माहिती लिहून प्रोजेक्ट तयार करायचा आहे. हा प्रोजेक्ट ९४२२०२८८३८ किंवा  9890220012 क्रमांकावर व्हाटसअप करावा किंवा vishwa685@gmail.com या मेलवर पाठवावेत. प्रकल्प तयार करून दि.३ मार्च २०२१ पर्यंत पाठवावेत. सदर स्पर्धा १ ली ते १० शालेय गट व ११ ते महाविदयालयीन खुला गट अश्या दोन विभागात घेतली जाईल. सदर स्पर्धेमधील प्रोजेक्ट आँनलाईन अथवा कोव्हीडच्या सामाजीक नियमाचे पालन करून प्रत्यक्षही जमा करता येतील. प्रोजेक्ट आकर्षक असावेत व एका प्रोजेक्टमध्ये एकाच लेखकाची माहीती असावी. या स्पर्धेमध्ये क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना विशेष कार्यक्रमात प्रमाणपत्र देण्यात येतील असेही ते म्हणाले.
यावेळी डॉ.दत्तात्रय बारबोले, प्रा.विनायक सुर्यवंशी, डॉ.जनार्दन परकाळे उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments