मराठा सेवा संघाकडून शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा

करमाळा (कटूसत्य वृत्त): करमाळा तालुका मराठा सेवा संघाकडून शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. करमाळा येथील लावंड हॉस्पिटल येथे जिजाऊ ब्रिगेडच्या तृप्ती ताई शिंदे व जिजाऊ ज्ञान मंदिरच्या संचालिका ज्योती ताई वारे पाटील यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी बोलताना डॉ बिभीषण सारंगकर यांनी छत्रपती शिवरायांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकत शिवजयंती नाचून नाही तर वाचून झाली पाहिजे असे मत व्यक्त केले. यावेळी मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष अतुल वारे पाटील, सचिव सचिन शिंदे,संघटक सागर वारे ,डॉ पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष सतीश वीर, तालुकाध्यक्ष अजित कणसे,सचिव संतोष शितोळे,सुनीता सतीश वीर, रुपाली संतोष शितोळे,डॉ बाबुराव लावंड,डॉ अक्षय पुंडे,डॉ संजय कोग्रेकर,डॉ तुषार गायकवाड, डॉ महेश वीर,डॉ अनुप खोसे,डॉ विनोद गादिया,डॉ हर्षल माळवदकर,डॉ अविनाश घोलप,डॉ चंद्रकांत सारंगकर, डॉ उमेश जाधव,डॉ रविकिरण पवार,डॉ बिपीन परदेशी, डॉ भोसले, डॉ आकाश शिंदे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष तानाजीराजे शिंदे, उद्योजक अमोल दादा पाटील,उदयनराजे वारे पाटील,शंभूराजे वारे पाटील,आदी उपस्थित होते.यावेळी जेऊर येथील प्रदीप सरडे यांना मराठा सेवा संघ तालुका संघटकपदी नियुक्तीचे पत्र देण्यात आले. अतुल वारे पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.
0 Comments