Hot Posts

6/recent/ticker-posts

लमाणतांडा ते दादपूर रस्त्याच्या कामाचा केला शुभारंभ

लमाणतांडा ते दादपूर रस्त्याच्या कामाचा केला शुभारंभ 



कामती (कटूसत्य वृत्त):- मोहोळ तालुक्यातील लमाणतांडा ते दादपूर या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ नुकताच आ. यशवंत माने यांच्या हस्ते तर लोकनेते शुगरचे चेअरमन बाळराजे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. याप्रसंगी बोलताना आ. माने म्हणाले की, दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करणे हे माझे आद्य कर्तव्य समजतो, म्हणूनच मी हा रस्ता 25/15 विकास निधी या योजनेअंतर्गत पाठपुरावा करून आणलेला आहे व त्या कामाचा शुभारंभ करीत आज आपण करीत आहोत. मला राज्यपातळीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार व स्थानिक पातळीवर माजी आमदार राजन पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांच्यासह सर्वच सहकारी सहकार्य करत असल्याने मी ही जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडत असल्याचे ही शेवटी आ. यशवंत माने यांनी सांगितले. यावेळी पंचायत समितीचे उपसभापती अशोक सरवदे, प्रकाश चवरे, दूध संघाचे संचालक दीपक माळी, तानाजी राठोड, दादपूरचे जगन्नाथ साठे, दिगंबर पवार, कांबळे, लमाणतांडा येथील सरपंच उपसरपंच व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments