मोहोळ शहरभर निवडणूक आणि उमेदवारीची चर्चामात्र प्रभाग 6 मध्ये केवळ आणि केवळ विकासाची चर्चादत्तात्रय खवळे यांनी साध्य केला प्रभागाचा स्वप्नवत विकास

मोहोळ (साहील शेख ) : मोहोळ शहराच्या पूर्व भागातील अत्यंत महत्त्वाचा प्रभाग म्हणून ओळखल्या गेलेल्या प्रभाग क्रमांक सहा मध्ये विविध विकासकामे सध्या प्रगतीपथावर आहेत. त्यामुळे शहरातील इतर प्रभागात जरी कोण निवडणूक लढवणार? कोण जिंकून येणार ? कोण बंडखोरी करणार याची चर्चा होत असताना प्रभाग सहामध्ये मात्र केवळ आणि केवळ विकासाची चर्चा सुरू आहे. प्रभागाचे दक्ष नगरसेवक दत्तात्रय खवळे यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून मोठ्या प्रमाणात रस्ते पाणी आरोग्य सुविधांसाठी निधी खेचून आणला आहे.
नमस्कार माजी आमदार तथा नगरपरिषदेचे विकास मार्गदर्शक राजन पाटील, विद्यमान दक्ष आमदार यशवंत तात्या माने यांनी दत्तात्रय खवळे यांनी मागणी केल्यानुसार प्रभाग सहासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सातत्याने मोहोळ शहराला निधीबाबत झुकते माप देण्याची भूमिका घेतली आहे. याचा मोठा फायदा मोहोळ शहरातील विवीध प्रभागांना होत आहे. त्यामध्ये राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्तात्रय खवळे यांच्या प्रभाग 6 चा देखील समावेश आहे. गेल्या पाच वर्षात विक्रमी निधी खेचून आणून त्यामधून मोठ्या प्रमाणात विकासकामे झाल्यामुळे प्रभागातील सर्वसामान्य जनतेमध्ये समाधानाचे वातावरण आहे.गत आठवड्यामध्ये मोहोळचे माजी आमदार तथा नगर परिषदेचे विकास मार्गदर्शक राजन पाटील यांच्या हस्ते दत्तात्रय खवळे यांच्या प्रभाग क्रमांक सहामध्ये विविध विकास कामांचा धुमधडाक्यात शुभारंभ झाला. यावरून या पुढील काळातही या प्रभागात केवळ विकास आणि विकासाचे राजकारण होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
खत्तात्रय खवळे हे राजन पाटील यांचे अत्यंत निकटवर्तीय आणि विश्वासु समर्थक मानले जातात. पाटील परिवाराशी खवळे यांच्या निष्ठेचा स्नेह अत्यंत वृद्धिंगत झाला आहे. माजी आमदार राजन पाटील आणि दक्ष आमदार यशवंत माने यांनी नेहमीच दत्तात्रय खवळे यांनी केलेल्या पाठपुराव्याची दखल घेऊन प्रभागाकडे लक्ष दिले. त्यामुळेच या प्रभागाचा विकासात्मक चेहरामोहरा दत्तात्रय खवळे हे बदलू शकले आहेत. खवळे यांची विकासकामे करण्याची धमक आणि उत्कृष्ट संघटन कौशल्य यामुळे युवा नेते बाळराजे पाटील,अजिंक्यराणा पाटील यांनीही खवळे यांना विकासाबाबत मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे पाटील परिवाराच्या मार्गदर्शनाखाली सध्या प्रभाग क्रमांक सहा प्रभाग झपाट्याने विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यामुळे येत्या काळातील प्रभागातील निवडणुकीवरही राष्ट्रवादी काँग्रेस आणि खवळे यांचाच प्रभाव कायम राहणार आहे. त्यामुळे येत्या काळातील निवडणुकीत राष्ट्रवादी उमेदवाराचा विजय निश्चित मानला जात आहे
0 Comments