पिसेची विहीर महाकालेश्वर मंदिर परिसर सुशोभीकरण करणार..
अजिंक्यराणा पाटील यांनी ऐतिहासिक विहिरींची पाहणी करून तरुणांची केली प्रशंसा
मोहोळ (कटुसत्य वृत्त ):- मोहोळ शहरातील श्रमदानातून तरुणांनी चार महिने स्वच्छतेच्या माध्यमातून ऐतिहासिक विहिरीचाही केलेल्या कामाचे कौतुक करून या पुढील काळात आपल्याला माझ्याकडून कोणत्याही प्रकारचे सहकार्य लागल्यास निसंकोचपणे माझ्याकडे हक्काने यावे असे अजिंक्यराणा पाटील यांनी तरुणांशी सवांद साधताना सांगितले.खरेतर तरुणांनी केलेल्या कार्याचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे अशी भावना व्यक्त केली.यावेळी पिसेची विहीर महाकालेश्वर मंदिर सुशोभीकरांचे कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते राहुल तावसकर व अमोल महामुनी यांनी ऐतिहासिक विहिरींची व महाकालेश्वर मंदिर व परिसरातील सुशोभीकरांचे काम झाल्यानंतर गल्लीच्या सौंदर्यात भर पडेल व घाणी पांसून नागरिकांची सुटका होईल तरी लवकरात लवकर आपण पाठपुरावा करून निधीची व्यवस्था करण्याची मागणी केली.
यावेळी पिसेची विहीर व महाकालेश्वर मंदिर समितीचे राहुल तावसकर ,अमोल महामुनी नसीर मोमीन व संपूर्ण टीमसह गल्लीतील धनंजय गोटे , ,कांचन अष्टुळ,दिलीप नागपुरे ,सावकार बोराडे,बाळू गवळी ,सुनील गोटे.
0 Comments