Hot Posts

6/recent/ticker-posts

नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर मतदार याद्यांमध्ये बाहेरची नावे घुसवणार्‍या प्रशासन आणि संबंधितावर कारवाई करा माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांची मागणी सोशल डिस्टंसिंग पाळत काढला मोहोळमध्ये मोर्चा

 नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर मतदार याद्यांमध्ये बाहेरची नावे घुसवणार्‍या प्रशासन आणि संबंधितावर कारवाई करा माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांची मागणी सोशल डिस्टंसिंग पाळत काढला मोहोळमध्ये मोर्चा

 

मोहोळ (कटूसत्य वृत्त) :- येत्या काळात होणाऱ्या नगरपरिषदेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून गेल्या वर्षभरापासून मोहोळ शहराच्या मतदार याद्यांमध्ये भागनिहाय छेडछाड करून अनेक तालुक्याच्या जिल्ह्याच्या बाहेरची मते निवडणुकीच्या मतदार यादी मध्ये घुसडले आहेत. याबाबत प्रशासनास निवेदन दिले होते तरीही प्रशासनाने योग्य ती कार्यवाही न केल्याने आम्हाला हा मोर्चा काढावा लागला आहे. कोरोणाच्या महामारीच्या काळात मला मोर्चा काढू नये म्हणून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने मोहोळ पोलिस प्रशासनाने नोटीस दिली आहे. तरीही अनावश्यक गर्दी टाळून मी हा मोर्चा मोहोळ शहराच्या सर्वांगीण हितासाठी काढत आहे. मतदार यादी मध्ये नावे घुसडणे ही लोकशाहीचा गळा घोटणारी घटना असून याचा सखोल तपास होऊन संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस तथा मोहोळ चे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी केली.
मोहोळ नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम लागला असून यासाठी झालेल्या मतदार नोंदणी प्रक्रियेमध्ये एकूण मतदारांच्या तुलनेत ज्यादा नोंदणी झाल्याने बोगस मतदार समाविष्ट झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांची नावे कमी करून नवीन मतदार यादी प्रसिद्ध करावी, तसेच यास जबाबदार अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी ज्योती क्रांती परिषदेच्या वतीने कोरोनाचे नियम पाळत प्रदेशाध्यक्ष रमेश बारसकर यांच्यासह मोजक्याच कार्यकर्त्यांचा मोर्चा तहसील कार्यलयावर दि २३ फेब्रु रोजी काढण्यात आला.
         यावेळी रमेश बारसकर, शिलवंत क्षीरसागर, ॲड विनोद कांबळे, संगिता पवार, हाजी बिलाल शेख यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
      क्रांती भवन पासून सदर मोर्चास प्रारंभ करण्यात आला पुढे गवत्या मारुती चौक, आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बुधवार पेठ मार्गे हा मोर्चा तहसील कार्यालयावर येऊन थांबला. यावेळी तहसील कार्यालय समोर नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी आपले मनोगत व्यक्त करून ह्या मोर्चाविषयी आपली भूमिका व्यक्त करत सदरची बोगस मतदार नोंदणी रद्द करण्याची मागणी केली.
         यावेळी नगरसेवक अतुल क्षीरसागर, भीम युवा प्रतिष्ठानचे ॲड विनोद कांबळे, प्रदेश प्रवक्ता शिलवंत क्षीरसागर, ज्योती क्रांतीचे शहराध्यक्ष सोमनाथ भालेराव, माजी सरपंच बिलाल शेख, ज्योती क्रांतीच्या महिला तालुकाध्यक्ष संगीता पवार, तन्वीरभाई शेख शाखा प्रमुख प्रभाग क्रमांक ७, ज्योती ननवरे, , सागर अष्टुळ, सिद्धार्थ एकमल्ले, शशिकांत सनगर आदी उपस्थित होते.


Reactions

Post a Comment

0 Comments