लक्ष्मीनगर येथे कोरोनामुक्त गाव अभियानांतर्गत प्रभात फेरी संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, January 25, 2021

लक्ष्मीनगर येथे कोरोनामुक्त गाव अभियानांतर्गत प्रभात फेरी संपन्न

 लक्ष्मीनगर येथे कोरोनामुक्त गाव अभियानांतर्गत प्रभात फेरी संपन्न





सांगोला (जगन्नाथ साठे)  लक्ष्मीनगर ता- सांगोला येथे सर्व शिक्षक, आरोग्य कर्मचारी ग्रामपंचायत कर्मचारी, शिक्षकेतर कर्मचारी ,आशा वर्कर, या सर्वांच्या सहभागाने तसेच पाचवी ते आठवी शाळा सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर व मतदार दिवसाचे औचित्य साधून माझे गाव कोरोनामुक्त गाव अभियानांतर्गत 'जनजागरण प्रभातफेरी" उत्साही वातावरणात काढण्यात आली.
        माझे गाव कोरोना मुक्त अभियान हे 7 डिसेंबर 2020 पासून सुरू झाले असून त्याचाच एक भाग म्हणून प्रत्येक गावांमध्ये प्रभात फेरी घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. जिल्ह्यातील बहुतांशी ग्रामपंचायत निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे सदर कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. त्यामुळे ही प्रभात फेरी आज लक्ष्मीनगर गावात सकाळी नऊ वाजता घेण्यात आली. या प्रभात फेरी च्या माध्यमातून "माझे गाव कोरोना मुक्त गाव" या अभियानाचा एक भाग म्हणून सदर प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी सहभागी शिक्षकांनी आणि कर्मचाऱ्यांनी कोरोना जनजागृती,मतदान जनजागृती करण्याच्या हेतूने घोषणा दिल्या.




       या प्रभात फेरीचा प्रामुख्याने कोरोना विरोधात लढाई तीव्र करणे, कोरोना चाचणीसाठी लोकांना प्रेरित करून मोठ्या प्रमाणात तपासण्या करणे, कोरोनाचे नियम पाळण्यासाठी जनजागरण करणे,मास्कचा वापर वाढवणे, सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे तसेच 27 जानेवारी 2021 पासून इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू होत असून त्यासंदर्भात जनजागृती करून विद्यार्थी व पालकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, मतदार दिवस साजरा करणे, मतदारांमध्ये मतदान करण्याचे प्रमाण वाढविण्याबाबत जनजागृती करणे, एकंदरीतच प्रत्येक गावात कोररोना विरोधी वातावरण निर्माण करून स्वच्छतेच्या सवयी लावण्यासाठी या जनजागरण प्रभात फेरी च्या माध्यमातून संदेश देण्यात आले.
      यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक, तलाठी ग्रामसेवक, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका ,मदतनीस, पाणीपुरवठा कर्मचारी, आरोग्य कर्मचारी बँकेतील कर्मचारी, सहकारी संस्था सेवाभावी संस्था इत्यादी संस्थेतील कर्मचार्‍यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवला. यावेळी उपस्थित शिक्षकांनी मतदान जनजागृती आणि कोरोना विरोधात घोषणा दिल्या. सदर जनजागृती प्रभात फेरी मध्ये माध्यमिक विद्यालय लक्ष्मीनगर  शाळेतील मुख्याध्यापक व सर्व शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नरळे मळा,बाड मळा लक्ष्मीनगर  या शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी व अंगणवाडी सेविका मदतनीस, आशा वर्कर,ग्रामपंचायत कर्मचारी पोलीस पाटील इत्यादींनी सहभाग नोंदवला या प्रभात फेरीच्या निमित्ताने जवळपास 30 हून अधिक लोकांची कोरोना चाचणी घेण्यात आली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages