भाजपा माढा तालुका वतीने टेंभुर्णी येथे महावितरण कार्यालयास टाळे ठोक आंदोलन


टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त): कोरोना काळातील संपूर्ण वीज बिल माफ करावे, शेतकऱ्यांच्या मालाला भाव द्यावा आदी मागण्या साठी माढा तालुका भाजपच्या वतीने भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी सकाळी 11 वा टेंभुर्णी येथे आंदोलनाला सुरुवात झाली.
टेंभुर्णी ग्रामपंचायत कार्यालयासमोर असलेल्या अण्णाभाऊ साठे पुतळ्यास हार घालून मोर्चाला प्रारंभ करण्यात आला टेंभुर्णी ग्रामपंचायत करमाळा चौकामधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार घालून वीज वितरण कंपनी कार्यालयास टाळे ठोक आंदोलन करण्यात आले.
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख म्हणाले की,सत्तेतील तिघाडी सरकारने वीज मोफत देण्याची घोषणा केली होती.महापूरात शेती वाहून गेली,कोरोना काळात शेतीमालास भाव मिळाला नाही.दूध दर कोसळले.यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.याकडे लक्ष देण्यास अपघाताने सत्तेवर आलेल्या तिघाडी सरकारकडे वेळ नाही. यामुळे सरकारचे डोके ठिकाणावर आणण्यासाठी आजचे वीज कार्यालयास 'टाळे ठोक आंदोलन' करण्यात आले असल्याचे श्रीकांत देशमुख यांनी सांगितले. यावेळी देशमुख यांनी राज्य सरकारवर टीका करताना काँग्रेस,राष्ट्रवादी यांच्यात मेळ दिसत नाही.यांच्यात कुरघोडीचे राजकारण सुरू आहे असे सांगत वीजबिल माफ करा अशी जोरदार मागणी केली.
यावेळी माढा तालुकाध्यक्ष योगेश बोबडे बोलताना म्हणाले की,हे सरकार कुठलाही जनाधार नसलेले सरकार आहे. वीजबिल माफ करावे अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यावेळी मदन मुंगळे,विठ्ठल मस्के यांची ही भाषणे झाली. यावेळी महावीज कंपनीचे अधिकारी यांना निवेदन देऊन थोड्यावेळासाठी कार्यालयास कुलूप ठोकण्यात आले.
0 Comments