Hot Posts

6/recent/ticker-posts

आमदार शहाजीबापू पाटील यांच्या आमदार फंडातून सांगोला तहसील कार्यालयास संगणकीय साहित्य प्रदान

आमदार शहाजीबापू पाटील यांच्या आमदार फंडातून सांगोला तहसील कार्यालयास संगणकीय साहित्य प्रदान

          सांगोला, (कटूसत्य वृत्त): प्रशासकीय कामकाजामध्ये सर्वाधिक भार असलेल्या महसूल प्रशासनाच्या कामकाजाला गती यावी, नागरिकांची कामे वेळेत पूर्ण व्हावीत  या हेतूने सन 2020-21 या आर्थिक वर्षातून आमदार शहाजीबापू पाटील यांच्या आमदार फंडातून तहसील कार्यालयातील कामकाजाकरीता  5 संगणक, 5प्रिंटर, व 2 स्कॅनर मशीन देण्यात आल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.

          अत्याधुनिक युगात प्रत्येक शासकीय निमशासकीय कार्यालयांमध्ये संगणकीकृत कार्य सुरू आहे सर्व शासकीय कार्यालयामध्ये संगणकीय कार्य करण्यात येते यामध्ये सर्वाधिक कामकाजाचा भार असलेल्या महसूल प्रशासनातील कामकाजामध्ये या नवीन साहित्या मुळे गती मिळणार आहे.

          तहसीलदार अभिजीत पाटील यांच्या मागणी पत्रावरून आमदार शहाजीबापू पाटील यांनी 3 लक्ष 50 हजार रुपये आमदार निधी खर्चून ते साहित्य आज आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते तहसील कार्यालयात प्रदान करण्यात आले. यावेळी तहसीलदार अभिजीत पाटील, नगराध्यक्ष रफिक नदाफ, उदयबापू घोंगडे, प्रा संजय देशमुख, पिंटू पुकळे, उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments