Hot Posts

6/recent/ticker-posts

राजमाता महिला पतसंस्थेच्या वतीने हळदी कुंकूवाचा कार्यक्रम संपन्न

राजमाता महिला पतसंस्थेच्या वतीने हळदी कुंकूवाचा कार्यक्रम संपन्न

          सांगोला (कटूसत्य वृत्त): सांगोला शहरातील राजमाता पतसंस्थेच्या वतीने शुक्रवार दि. 22 जानेवारी रोजी पुण्यश्‍लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर उद्यानामध्ये मकरसंक्रातीचे औचित्य साधून हळदी कुंकूवाचा कार्यक्रम राजमाता महिला पतसंस्थेच्या वतीने घेण्यात आला.

          सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला पतसंस्थेच्या सेक्रेटरी सौ. मनिषा हुंडेकरी यांनी केले. यामध्ये त्यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. तसेच राजमाता महिला पतसंस्थेच्या संस्थापिका नगराध्यक्षा सौ. राणीताई माने यांनी त्यांच्या मनोगतामध्ये महिलांनी छोटे मोठे व्यवसाय उद्योग सुरू करून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, यासाठी त्यांना बचत गटाच्या माध्यमातून पतपुरवठा करण्यासाठी मदत केली जाईल, असे अश्‍वासनही त्यांनी यावेळी दिले.

          या कार्यक्रमासाठी अ‍ॅड. राजेश्‍वरी केदार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अ‍ॅड. राजेश्‍वरी केदार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना महिलांना त्यांचे कायदेविषयक अधिकार व सोशल मिडीया वरून हॅकिंग करून होणार गैरप्रकाराला बळी न पडता त्यावरील काय उपाय करता येतील याबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी मा. उपनगराध्यक्षा नगरसेविका सौ. स्वातीताई मगर, संस्कृती मासाळ यांनीही आपले मनोगत केले.  

          सदर कार्यक्रमामध्ये नुतन पदाधिकार्‍यांचा सत्कार करून सन्मान करण्यात आला.  यामध्ये नगरपरिषदेच्या बांधकाम सभापती सौ. अप्सराताई ठोकळे, पाणीपुरवठा सभापती सौ. शोभाकाकी घोंगडे, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. अनुराधा खडतरे, धायटी ग्रा. पं. सदस्या आशाताई सरगर, वझरे ग्रा. पं. सदस्या प्राजक्ता सरगर यांचा सत्कार करण्यात आला.

          यावेळी नगरसेविका सौ. छायाताई मेटकरी, राजमाता महिला पतसंस्थेच्या चेअरमन सौ. नसरीन तांबोळी, व्हा. चेअरमन नगरसेविका सौ. अप्सराताई ठोकळे, संचालिका सौ. अनुराधा व्हटे, सौ. स्वप्नाली सादिगले, सौ. नकुशा जानकर, सौ. कुशाला माने, सौ. जानकी घाडगे, सौ. प्रियंका श्रीराम, सौ. कविता वाघ यांच्यासह इतर सर्व महिला सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल सौ. प्रियांका श्रीराम यांनी सर्वांचे आभार मानले.

Reactions

Post a Comment

0 Comments