Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर शहरातील नकारात्मक किंवा लाल (Negative or Red Zone) क्षेत्रातील रहिवाश्यांना बँकेतून कर्ज देण्यात यावे

 सोलापूर शहरातील नकारात्मक किंवा लाल (Negative or Red Zone) क्षेत्रातील रहिवाश्यांना बँकेतून कर्ज देण्यात यावे

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये आमदार प्रणिती शिंदे यांची मागणी

          सोलापूर (कटूसत्य वृत्त): आज दि. 23 जानेवारी 2021 रोजी नियोजन भवन सभागृह, शासकीय दुध डेअरी शेजारी, सोलापूर येथे जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. यामध्ये आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर शहरात नकारात्मक किंवा लाल क्षेत्र (Negative or Red Zone) क्षेत्रातील रहिवासी अर्जदारांची वैयक्तिक स्तरांवर चौकशी, पाहणी व निरीक्षण करुन त्यांना बँकांतून  कर्ज देण्यात यावे याबाबत मागणी केली.

          यामध्ये सोलापूर शहरातील बँकांकडे नकारात्मक किंवा लाल क्षेत्र (Negative or Red Zone), उदा. सेटलमेंट, रामवाडी, शास्त्री नगर, बापूजी नगर, काही गृहनिर्माण संस्था इ.) म्हणून वर्गीकृत केलेल्या क्षेत्रांची सूची असते. अर्जदार हा आवश्यक कागदपत्रांची व नियमावलींची पूर्तता करु शकत असताना ही अर्जदार हा केवळ संबंधित वर्गीकृत केलेल्या नकारात्मक किंवा लाल क्षेत्र (Negative or Red Zone) क्षेत्रातील रहिवासी असल्याकारणाने बँक कर्ज प्रकरणास नकार देते. परिणामी, अनेक युवक व युवती हे शौक्षणिक, गृह, उद्योग-व्यवसाय व इतर कर्ज मिळत नसल्याने हतबल व निराश होत असल्याचे निदर्शनास येत आहे. स्वयंरोजगार उद्योग व्यवसाय करून स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी धडपडणाज्या तरुणांना बँकांनी प्रोत्साहन व मदत करणे ही शासनाच्या अंगीकृत संस्थांची नैतिक जवाबदारी व कर्तव्य आहे, याबाबत सातत्याने नागरीकांची तक्रारी येत आहेत.

          याबाबत येत्या 15 दिवसांमध्ये मा. श्री. दत्तात्रय भरणे साहेब, राज्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री, सर्व लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, बँकेचे मॅनेजर, संबंधित अधिकारी यांच्यासमवेत बैठक होणार आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments