फिट इंडिया अभियानाअंतर्गत मोडनिंब येथे सायकल रॅली स्पर्धा

मोडनिंब (प्रकाश सुरवसे)(कुटूसत्य. वृत्त.): फिट इंडिया जनजागृती अभियानाअंतर्गत आज मोडनिंब येथे सायकल रॅली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या सायकल रॅली मध्ये सुमारे २५ जणांनी सहभाग नोंदवला. सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मोडनिंब येथील एसटी स्टँड मधून या रॅलीला सुरुवात झाली. पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या अरण येथील संत सावतामाळी महाराजांच्या दर्शनानंतर ही रॅली पुन्हा मोडनिंब येथील एसटी स्टँडवर पोहचली.
छोरिया हॉलीबॉल संघाच्यावतीने फिट इंडिया जनजागृती अभियानाअंतर्गत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आर्ट ऑफ लिव्हिंगचे योग प्रशिक्षक परमेश्वर सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली यशस्वी झाली. प्रमोद माळी, प्रकाश सुरवसे, सुनील सोनंदकर, बालाजी गाडेकर, संतोष भोरे, गोकुळ अस्वरे यांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
0 Comments