चिंच झाड नुकसानी केल्याप्रकरणी टेंभुर्णी येथे फिर्याद दाखल

मोडनिंब (प्रकाश सुरवसे)(कुटूसत्य. वृत्त.): फळे असलेल्या चिंचेच्या झाडाचे नुकसान केल्याप्रकरणी टेंभुर्णी पोलिसात फिर्याद दाखल झाली आहे. व्होळे (ता. माढा) येथील शेतकरी नवनाथ जालिंदर चोपडे यांच्या शेतात सुमारे तीस वर्षांपूर्वी लावलेले चिंचेचे झाड आहे.
सध्या या झाडाला फळे लागलेली आहेत. शेजारी बांधकरी असलेले चोपडे कुटुंबीय यांनी आमच्या शेतात झाडाच्या फांद्या येतात हा राग मनात धरून झाडाखाली उसाचे पाचट ठेवून झाड पेटवून दिले.यामुळे झाडाच्या एका बाजू चे पूर्णपणे जळून नुकसान झाले आहे.
तुम्ही आमचे काहीही करू शकत नाही असे म्हणून नवनाथ चोपडे यांना शिवीगाळ दमदाटी केली आहे. यासंदर्भात नवनाथ चोपडे यांनी त्यांचे बांधकरी तानाजी बाबूराव चोपडे, वैभव तानाजी चोपडे,वैशाली तानाजी चोपडे या कुटुंबातील सदस्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी टेंभुर्णी पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या फिर्यादी मध्ये केली आहे. असून पुढील तपास पोलिस कर्मचारी शिवाजी भोसले करीत आहेत.
0 Comments